Home राजकारण प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार सुरेश तिवारी यांच्या प्रचारासाठी शिवसेनेची भव्य रॅली,...

प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार सुरेश तिवारी यांच्या प्रचारासाठी शिवसेनेची भव्य रॅली, शिवसेना उपनेते स्वर्गीय अनिल राठोड यांच्या अनुपस्थितीत पहिलीच निवडणूक.

अहमदनगर – दि.१३ डिसेंबर
अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ (क ) प्रभागाची पोटनिवडणूक आता रंगत घेत असून शिवसेनेने आज भव्य रॅली काढून हा प्रभाग पिंजून काढला आहे. शिवसेनेचे उमेदवार सुरेश तिवारी यांच्यासाठी सिद्धार्थ नगर परिसरात ही रॅली काढण्यात आली होती. शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर,शहर प्रमुख संभाजी कदम, युवा सेना प्रमुख विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, दत्ता जाधव, नगरसेवक गणेश कवडे ,माजी विरोधी पक्ष नेता संजय शेंडगे, गौरव ढोणे, कैलास शिंदे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शिवसेना उपनेते स्वर्गीय अनिल राठोड यांच्या निधनानंतर त्यांच्या अनुपस्थितीत ही नगर शहरातील पहिलीच निवडणुक असून राठोड यांची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवते आहे.

या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले असले तरी काँग्रेसने मात्र अलिप्त धोरण ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा अलगद काटा काढल्याचे बोलले जाते राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी शहरात आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version