अहमदनगर सुथो-
फंड पे च्या नावाखाली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून साडे सात कोटींना गंडा घालून कंपनीच्या मालकाने पळ काढला आहे २०१९ मध्ये बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून ‘फ़ंड पे’ नावाचे वॉलेट सोमनाथ एकनाथ राऊत यांनी सुरू केले होते. या कंपनीच्या माध्यमातून पतसंस्था,मोबाईल रीचार्ज, विविध कंपन्या यांचे ऑनलाईन बिल पेमेंट, आर्टिजीएस,एन एफ टी बिल देण्याची सेवा देण्याचे काम कंपनी मार्फत सुरू होते. या कंपनीत१ लाख रकमेची सुथोगुंतवणूक केल्यानंतर ३०० ते १५०० प्रतिदिन कमिशन देण्यात येत असल्याने या आमिषाला बळी पडून अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली.सोलापूर, सांगली, कोल्हापूर, बीड , नागपूर, नाशिक, उस्मानाबाद, औरंगाबाद, मुंबई, पुणे, अशा राज्यभर गुंतवणूकदारांचे सुथोजाळे या कंपनीच्या माध्यमातून राऊतने पसरवले होते
पुणे येथे मुख्य शाखा तर अहमदनगर शहरामध्ये एमआयडीसी आणि एकविरा चौक या ठिकाणी दोन शाखा या कंपनीच्या कार्यरत होत्या. विविध गुंतवणूकदारांच्या माध्यमातून सुमारे पन्नास कोटीसुथो रुपयांची रक्कम राऊत याने गोळा केली होती. काही रक्कम ऑनलाईन तर काही चेकच्या स्वरुपात गुंतवणूकदारांनी दिली होती. या कंपनीत अहमदनगर शहरातील वंदना पालवे ,सुप्रिया आरेकर ,प्रीतम शिंदे, प्रीती शिंदे,शॉलंमन गायकवाड यांनी सोमनाथ राऊत याला सहकार्य केले होते.
विशेष म्हणजे या कंपनीची विविध वृत्तवाहिनीवर जाहिरातीही सुरू होत्या त्यामुळे प्रथम गुंतवणूकदारांना या कंपनी बद्दल खूप आकर्षण बनले होते. मात्र हळूहळू फोन न उचलणे पैशाचा परतावा न देणे यामुळे गुंतवणूकदारांनी पैशाची मागणी सुरू केली असता सोमनाथ शिंदे हा फरार झाला आहे त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे याप्रकरणी आता कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील सतीश बाबुराव खोडवे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून
सोमनाथ एकनाथ राऊत (वय 38, माऊली रेसिडेंसी, पाईपलाईन रोड, सावेडी) वंदना पालवे (केडगाव) सुप्रिया आरेकर (बुऱ्हाणनगर) प्रितम शिंदे (पुणे)प्रीती शिंदे (दिल्लीगेट) शॉलमन गायकवाड (पाईपलाईन रोड) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा ३ तसेच फसवणूक,फडवणुकीला सहकार्य करणे. या आरोपा खाली ४२०,३४ या कलमन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सोमनाथ राऊत हा त्याची पत्नी सोनिया सोमनाथ राऊत आपल्या पत्नी सह पळून गेला असून तो आपल्या पत्नीच्या नावावर आयसीसी आणि आरबीएल बँकेच्या खात्यावरून बिग मी इंडिया कंपनीच्या अकाउंट वर पैसे घेत होता. या कंपनीच्या मालकास इतर डायरेक्टर फरार झाल्याने आता छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांचे होण्याची वेळ आली आहे