मुंबई –
कर्जत जामखेड तालुक्याला एक जानेवारीपासून कुकडी चे पहिले आवर्तन सुटणार असून या निर्णयावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिक्कामोर्तब केले आहे. आज जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन भवन मध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक झाली यावर जामखेड कर्जत मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी १ जानेवारी पासून जामखेड कर्जत तालुक्यासाठी कुकडीचे आवर्तन सोडावे अशी मागणी केली होती. यावर चर्चा होऊन कोणत्याही तालुक्यावर अन्याय न होता या वर्तन सोडण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत झाला. अशी माहिती कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
आवर्तन सोडण्याबाबत शुक्रवारी कर्जत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत आमदार रोहित पवार यांनी बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यानुसार कोणत्याही तालुक्यावर अन्याय न होता एक जानेवारीपासून दोन्ही तालुक्यांना आवर्तन मिळावे अशी मागणी सर्व शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार आमदार रोहित पवार यांनी जयंत पाटलांकडे ही आग्रही मागणी केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी यावर सविस्तर चर्चा करून रोहित पवार यांची मागणी पूर्ण केली आहे. त्यामुळे आता एक जानेवारीला कुकडीचे आवर्तन सुटणार आहे