अहमदनगर प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांपासून बॅग लिफ्टिंग ,चैन स्नॅचिंग करणाऱ्या डोळ्यांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. बँकेमध्ये एखाद्या माणसावर नजर ठेवून त्यांनी पैसे काढून घरी घेऊन जात असताना वाटेतच त्याला लुटण्याचे प्रकार तसेच एकट्या महिला पाहून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र सोन्याचे दागिने चोरण्याचे प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी आता एक स्वतंत्र पथक नेमले असून पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे हे या पथकाचे प्रमुख आहेत तर या पथकात संजय खंडागळे, राजेंद्र वाघ, बापू फोलाने यांचा समावेश असून जिल्ह्यात कुठेही घटना घडली तर हे पथक तेथे जाऊन स्वतंत्र तपास करणार आहे. शहरासह जिल्ह्यातील अशा चोऱ्यांना आळा घालण्यासाठी हे पथक नेमले आहे.