अहमदनगर दि.३१ जानेवारी
भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या आद्यक्षतेखाली बैठक आयोजित केली आहे .या बैठकीला भाजपचे उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री रविजी अनासपुरे आणि प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.या बैठकीला खासदार सुजय विखे पाटील , शिवाजीराव कर्डीले, आमदार बबनराव पाचपुते , आ.मोनिकताई राजळे, मा.आ.चंद्रशेखर कदम , प्रदेश सदस्य भानुदास बेरड सर या सर्वांची उपस्थती राहणार आहे.
या बैठकीत मायक्रो डोनेशन,1 बूथ 30 युथ,
बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान,मन की बात,सुदृढ बालक स्पर्धा,आगामी येणाऱ्या नगरपालिका तसेच जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकी बाबत विचारमंथन होणार आहे.
भारतीय जनता पार्टी जिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यकारणी , जिल्हा मोर्चे व आघाडी प्रमुख व सहप्रमुख , तसेच तालुका अध्यक्ष व सरचिटणीस , जिल्हा व मंडळ बूथ संयोजक , तालुका प्रभारी , तालुका मोर्चे आघाडी प्रमुखांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग आणि जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी केले आहे. 3 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष भैया गंधे यांच्या कार्यालयात बैठकीतचे आयोजन करण्यात आले आहे.