Home Uncategorized भुवनेश्वर येथे झालेल्या सिनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नगरच्या कोमल वाकळे हिने पटकावले...

भुवनेश्वर येथे झालेल्या सिनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नगरच्या कोमल वाकळे हिने पटकावले सुवर्ण पदक

अहमदनगर दि .४ एप्रिल
अहमदनगरच्या कोमल नारायण वाकळे हिने भुवनेश्वर येथे झालेल्या सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत अहमदनगरचे नाव पटियाला मध्ये गाजवले आहे.

अहमदनगर शहरातील सावेडी भागात राहणाऱ्या शेतकरी असलेले नारायण वाकळे यांची मुलगी कोमल हिला लहानपणा पासूनच खेळाची आवड होती. कोमलने २००८ साली १२ वी मध्ये शालेय स्पर्धेत प्रथम वेटलिफ्टिंग मध्ये यश मिळवले आणि तेथून तिच्या या प्रवासाला सुरुवात झाली मात्र तिच्या या प्रवासाला आधी काही अडथळे आले काही लोकांनी तिच्या या वेटलिफ्टिंगच्या प्रवासाला नाव ठेवले मात्र आई वडील भाऊ बहीण यांनी कोमलला प्रोत्साहन देऊन ठामपने तिच्या प्रवासात तिच्या सोबत राहिल्याने भुवनेश्वर येथे   मार्च महिन्यात झालेल्या राष्ट्रिय सिनियर चॅम्पियन वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोमलन महाराष्ट्रा कडून सहभागी होत सुवर्णपदक मिळवले आहे.भारतातील सर्व राज्यातून आलेल्या १४ स्पर्धकांना मागे टाकत कोमलने ८७ किलो गटात २०२ किलो वजन उचलत कोमलने हे पदक पटकावले आहे .

नव आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालयात शिक्षण घेऊन एमसीएस आणि एमपीएड पदवीवीचे शिक्षण घेत आपल्या वेटलिफ्टिंगचा सराव कोमलने चालूच ठेवला नगर शहरात वेटलिफ्टिंग बाबत सुविधा नसल्याने मुंबई येथे जाऊन कोमलने सराव सुरू ठेवला आज पर्यंतच्या कारकिर्दीत कोमलने अनेक पदके मिळवली असून तिचे अंतिम लक्ष ऑलम्पिक पदक असून त्या दिशेने कोमल वाकळेचा प्रवास सुरु आहे.

कोमल वाकळेला परमजीत सिंग ,बुमराह धनाजी पाटील यांच्याकडून प्रशिक्षण मिळाले असून महाराष्ट्र वेटलिफ्टिंगचे सचिव संतोष सिंहासनी यांचे मार्गदर्शन भेटले आहे.कोमलने ऑलम्पिक विजेत्या मल्लेश्वरी यांच्या कडे पाहून प्रेरणा घेऊन आपला प्रवास सुरु ठेवला आहे

कोमल वाकळे तिने मिळवलेल्या या यशामुळे त्याचे नगर शहरात सर्वत्र कौतुक होत असून तिच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version