मुंबई -दि.२७ डिसेंबर
मुंबई येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महिला व बाल विकासमंत्री यशोमतीताई ठाकूर यांची नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी भेट घेऊन अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील अहमदनगर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागासाठी खासबाब म्हणून निधी उपलब्ध करून दयावा अशी मागणी केली.
तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत साहेब यांचीअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ण जीवित करणेबाबत मागणी केली.महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समिती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक २८/१२/२०१० व दिनांक १५/१२/२०११ च्या शासन निर्णयानुसार लागू असलेली १२ व १४ वर्षांची सुधारित सेवा तर्गत आश्वासित प्रगती योजना वित्त विभागाची परवानगी नसल्याने कारण देऊन उच्च वतंत्रशिक्षण विभागाने दिनांक ०७/१२/२०१८ आणि दिनांक १६/०२/२०१९ या शासन निर्णयाद्वारे रद्द केलेली आहे सदर दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात यावेत व सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्वक लागू करून मिळावी . तसेच सेवानिवृत्त व प्रत्यक्ष कार्यरत कर्मचारी यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून सेवानिवृत्त वेतनापासून व सातव्या वेतन आयोगाच्या वेतनापासून वंचित असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय देऊन दिनांक ०७/१२/२०१८ व दिनांक १६/०२/२०१९ च्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा शासन निर्णय लवकरात लवकर रद्द करून पूर्वरत सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वित्त विभागाची मान्यता घेऊन लागू करण्यात यावी यासाठी संबंधितांना आपल्या स्तरावरून योग्य कार्यवाही कारण्यासताही तातडीने सूचना देण्याची विनंती आमदार संग्राम जगताप यांनी मंत्री उदयजी सामंत याना केली यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत आमदार नितिन पवार हे उपस्थित होते.