अहमदनगर दि 2 एप्रिल
पुढील काळातील मातीचे आणि त्या बरोबर माणसाचे अस्तित्व जपायचे असेन तर माती वाचवण्यासाठी मोठं अभियान राबवणे गरजेचे आहे त्या साठी इशा स्वयंसेवक डॉ. स्वप्ना वाळके यांनी नागरिकांना आवहान केले असून आपल्या मातीच ऋण फेडण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितलंय
डॉ स्वप्ना वाळके या गेल्या १५ वर्षांपासून अध्यात्म मध्ये कार्यरत आहे, ज्यावेळी अध्यात्म बद्दल एका गुरुं कडून त्यांनी शिकायला सुरवात केली त्यावेळी त्यांच्या बरोबर त सर्वात लहान विद्यार्थिनी म्हणून त्यांचा सहभाग होता. काही वर्षांपासून सदगुरू यांच्या ईशा फाउंडेशन साठी डॉ स्वप्ना वाळके कार्य करीत आहे . तसेच निसर्गउपचाराची माहिती घेण्यासाठी त्यांनी निसर्गोपचारचे देखील शिक्षण घेतले आहे . यापूर्वीही पाणी फाउंडेशनसाठी आणि वेगवेगळ्या सामाजिक, वैश्विक चळवळीसाठी त्यांनी त्यांचा सहभाग नोंदविला आहे.
जगदीश “जग्गी वासुदेव” हे सदगुरू म्हणून ओळखले जातात, ते एक महान भारतीय योगगुरू आणि अध्यात्माचे समर्थक आहेत. १९८२ पासून दक्षिण भारतात सदगुरू योग शिकवत आहेत. १९९२ साली त्यांनी ईशा फाउंडेशनची स्थापना केली. ते एक शैक्षणिक उपक्रम राबविणारे आश्रम आणि योग केंद्र आहे. सद्गुरुंनी स्थापन केलेली ईशा फाउंडेशन ही एक ना – नफा ना तोटा संस्था आहे, ज्याचा उद्देश सर्वांसाठी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कल्याण साधणे आहे. ३० वर्षांहुन अधिक काळ ते पर्यावरण पुर्नसंचयित करण्याच्या कार्यात मग्न आहेत. भारतातील सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार- इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. ही संस्था जीर्णोध्दारावर लक्ष केंद्रित करणाऱ्या आघाडीच्या संस्थांसोबत भागीदारीत काम करते आणि युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बैट डेजर्टिफिकेशन ( UNCCD आणि UN Environment ( UNEP ) साठी मान्यताप्रा आहे. ईशा आउटरीच ईशाचा सामाजिक पोहोच उपक्रम सुप्त गुणांचे उदात्तीकरण करण्यासाठी, मानवाच्या आशा, आकांक्षा व महत्त्वकांक्षाचे उदात्तीकरण करण्यासाठी आणि पर्यावरण पुनर्संचयित करण्यासाठी अनेकविध प्रभावी उपक्रम राबविले जातात.
मार्च २०२२ ला माती वाचवा ही जागतिक चळवळ सुरु झाली आहे. ही चळवळ भारतातील पूर्वीच्या रॅली फॉर रिव्हर्स चळवळीच्या यशावर आधारित आहे. ज्याद्वारे १६२ दशलक्ष नागरिकांचा पाठिंबा नोंदवला गेला होता आणि देशातील पहिले राष्ट्रीय नदी पुनरुज्जीवन धोरण तयार करण्यास मदत झाली.
आता माती वाचवणया बद्दल अनेक देशांमध्ये जागरुकता निर्माण करून त्याचा समारोप भारतात होणार आहे. UN ने असा अहवाल दिला आहे की जर आपण आता आपल्या मातीचे व्यवस्थापन केले नाही तर २०५० पर्यंत माती तील ९०% घटक नष्ट होऊन माती निकृष्ट होऊन जाईल. परिणामी जागतिक अन्न संकट उदभवू शकते. यूएस मध्ये, मातीच्या -हासामुळे आपल्या अन्नातील सूक्ष्म पोषक घटकांचे ८७% नुकसान झाले आहे. हे एक गंभीरमूक संकट आपल्या पायाखाली उलगडत आहे. डॉ.जेन गुडॉल, परमपूज्य दलाई लामा, मार्क बेनिऑफ, मार्क वालबर्ग, रोसारियो डॉवसन आणि दीपक चोप्रा यांच्यासह इतर प्रमुख नेते सेव्ह सॉईलमध्ये सामील झाले आहेत. संकटाचा सामना करण्यासाठी बोलावलेल्या नेत्यांनी निर्णायकपणे कार्य करण्याचे आवाहन केले आहे. एक ६५ वर्षांची व्यक्ति मोटरसायकलवर ३० हजार किमी ची यात्रा करून संपूर्ण जगाला माती वाचवणे किती गरजेचे आहे हे पटवून देत आहे तर आपण ही आपल्या भविष्यासाठी, पुढच्या पिढीसाठी खारीचा वाटा उचलला पाहिजे. मातीचे आपल्यावर असणारे कर्ज फेडण्याची आता वेळ आली आहे.
एक स्वयंसेवक म्हणून मी आपल्या शहरातील जनतेला आवाहन करते ज्यांनी कोणी या चळवळीत नोंदणी केली असेल आणि ज्यांना यात काम करण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया ११ ते ०३ या वेळेत ९९२१२५७७७९ या क्रमांकावर संपर्क साधावा जेणे करून पुढील कार्यक्रमात त्यांना सहभागी होता येईल असे आवाहन डॉ स्वप्ना वाळके यांनी केले आहे.