अहमदनगर दि.२ एप्रिल
आयपीएल सामने ज्या प्रकारे हायफाय झाले आहेत त्या प्रकारे सट्टेबाजी पण हायफाय होत चालली आहे आता सट्टेबाजी कुठेही केव्हाही खेळण्यासाठी काही लिंक मुख्यबुकींच्या कडून खालच्या बुकींनी दिली जाते आणि मग ही लिंक खेळाडूंना दिली जाते आणि सट्टेबाजी सुरू होते.
मुख्यबुकीने दिलेली लिंक सट्टेबाजी करणाऱ्या खेळाडू पर्यंत पोहचली की त्याला खेळायचे लिमिट दिले जाते त्यासाठी लिंक देणाऱ्याला रोख पैसे द्यावे लागतात आशा आधुनिक पद्धतीमुळे आशा बुकींना आणि खेळाडूंना पकडणे सोपं राहिले नाही अशा करणामुळे या खेळात लहान लहान मुले सहभागी होऊ लागली आहे.
नगर मध्ये मोठ्या पर्वता कडून ही लिंक येत असते मग खालचे छोटे छोटे बुकी ही लिंक खेळाडू पर्यंत लिंक बरोबर पोहोच करतात मात्र याची हरजित झलेली रक्कम इनामे इतबारे दिले जातात.
तर सावेडी मधील एका कपड्याच्या दुकानातून लिंक व्हायरल केली जाते त्या ठिकाणीही मोठी उलाढाल होत असून प्रशासनाला हे माहीत असूनही डोळेझाक केली जातेय.
आशा आधुनिक सट्टेबाजी मुळे घरात बसूनही लिंक वर जाऊन सट्टा लावता येत असल्याने बुकींची चांगळ होत असली तरी अल्पवयीन मुले याची शिकार होऊ लागले आहेत.
शहरातील सर्वात मोठा बुकी पर्वताची सावली असून सावेडीच्या शि पण जोरात धंदा ओढतोय आणि पैसे गोळा करतोय करण वी मुळे सर्वनाच पाकिटे पोहच झाल्याने सर्वत्र आलबेल आहे.
एक मात्र खरे आहे की आयपीएल सिझन संपला की अनेक जण कर्जबाजारी होतात काही शहर सोडून जातात तर काही आत्महत्या करतात हे चित्र दर सिजन नंतर काही प्रमाणत पाहायला मिळतं या साठी पर्वताला आताच सुरुंग लावला नाही तर तरुण पिढीसह अल्पवयीन मुलं सट्टेबाजीच्या आहारी जाऊन आपले जीवन बरबाद करतील आणि सुरुंग लावायचं काम स्थानिक गुन्हे शाखाच करू शकते असं वाटतंय.