Home विशेष या कटींग दुकानाच्या नावाची महाराष्ट्रभर चर्चा..नाव वाचून तुम्हालाही धक्का बसेल!

या कटींग दुकानाच्या नावाची महाराष्ट्रभर चर्चा..नाव वाचून तुम्हालाही धक्का बसेल!

कराड – दि.४ जाने.
नावात काय असतं अनेक वेळा बोललो जातं मात्र नावातच सर्व काही असतं हे अनेक नावावरून लक्षात येतं. सध्या सातारा जिल्ह्यात एकच नावाची चर्चा चालू ती म्हणजे कोळे गावातील एका सलून दुकानाला दिलेल्या नावाची.
कराड-ढेबेवाडी या रस्त्यावर असणाऱ्या कोळे गावात प्रवेश करताच एक दुकानाची पाटी आकर्षित करते ही पाटी पाहून हसू पण येते आणि विचित्र पण वाटतं.मात्र गावात येणार नवीन माणूस ही पाटी पाहून थबकत नाही असं होतंच नाही.कारण या दुकानाच हे नावच जगावेगळ आहे.‘दुसरी बायको जेंन्टस पार्लर’ अस या दुकानाच नाव असून हे नाव देण्यामागचे कारणही खास आहे.

                            कराड तालुक्यातील कोळे गावातील अमोल सकपाळ यांचा सलून हा खानदानी व्यवसाय आहे. नवीन प्रवाहात जगण्यासाठी त्यांनी आपल्या दुकानाचे नूतनीकरण केले आहे. त्यानंतर अमोल सपकाळ यांनी या दुकानाला दुसरी बायको जेंट्स पार्लर हे नाव दिले हे नाव दिल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी अमोल यांना नावे ठेवली.तर घरातील त्यांची पत्नी आणि वडील यांनीही विरोध केला होता मात्र अमोल सपकाळ यांनी आपल्या पत्नीची आणि वडिलांची समजूत घालत जसा मी पत्नीबरोबर एकनिष्ठ राहतो तिच्या सहवासात असतो तिच्यावर जेवढ प्रेम करतो त्याचप्रमाणे माझं माझ्या दुकानावर तेवढच प्रेम आहे त्यामुळे घरात माझी पहिली बायको माझी सेवा करते तर मी दुसऱ्या बायकोच्या म्हणजेच दुकानाच्या सनिध्यातून तुमची सेवा करतो. त्यानंतर अमोल यांच्या पत्नीचा आणि वडिलांचा विरोध मावळला. काही दिवस गावातील लोकांमध्ये हा चर्चेचा विषय होता मात्र आता लोकांना नाव देण्यामागील भूमिका समजल्यानंतर गावातील लोकांनीही अमोल यांचे कौतुक केले आहे.

अमोल यांच्या दोन्ही बायका म्हणजेच पत्नी आणि दुकान खुश आहेत मात्र दुकानाचे नावाची चर्चा मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर जोरात सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version