Home जिल्हा युक्रेन मधून परतला अहमदनगर शहरातील पहिला विद्यार्थी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी...

युक्रेन मधून परतला अहमदनगर शहरातील पहिला विद्यार्थी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केले भरत तोडमल याचे स्वागत

अहमदनगर दि २७ फेब्रुवारी
रशिया आणि युक्रेन या दोन देशा मध्ये सध्या युद्ध सुरू झाले असून आज युद्धाचा चौथा दिवस आहे.

या युद्धा दरम्यान भरतातुन युक्रेन मध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी युक्रेन मधील विविध शहरात अडकून पडले होते.भारत सरकारने या अडकलेल्या विधर्थ्यांना पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू केले असून अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी पहिली तुकडी आज भारतात दाखल झाली आहे.

यामध्ये नगर शहरातील सावेडी उपनगरामधील संदेश नगर येथील भारत सोपान तोडमल हा विद्यार्थी आज नगर मध्ये सुखरूप पोहोचला भरत तोडमल युक्रेन मधील चेर्निव्हत्सी शहरातील बुकोव्हिनियन राज्य वैद्यकीय युनिव्हर्सिटी मध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात असून आज तो अहमदनगर मध्ये आपल्या घरी सुखरूप परतल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली होती.

माजी नगरसेवक निखिल वारे आणि नगरसेवक सुनील त्रिंबके यांनी भरत तोडमल यांच्या घरी जाऊन भरत तोडमल याची भेट घेऊन युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती बाबत भरत याच्या कडून सविस्तर माहीती घेतली.पहा व्हिडीओ

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version