अहमदनगर दि २८ फेब्रुवारी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साधने वाटपाचा कार्यक्रम सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या उपस्थित अहमदनगर शहरातील निशा लॉन्स या ठिकाणी पार पडला.
या वेळेस अहमदनगर दक्षिणचे खा.सुजय विखे पाटील,माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिकताई राजळे,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे ,शहर जिल्हाअध्यक्ष भैय्या गंधे, जिल्हाअधिकारी राजेंद्र भोसले,समाज कल्याण अधिकारी देवरे जिल्हशल्य चिकित्सक डॉ संजीव घोगरे,यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते.
प्रस्तावना करताना डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले
आज या कार्यक्रमात किमान पाच कोटी रुपयांचे साहित्य प्राथमिक स्वरूपात वाटप करणार असून या मुळे ग्रामीण शहरी भागातील साठ वर्षा वरील वयोवृद्ध नागरिकांना या
राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साधने वाटपाचा कार्यक्रम होत आहे हे साहित्य घेण्यासाठी फक्त आपले आधारकार्ड दाखवून आपले साहित्य घेऊन जायचे आहे या योजनेवर आधी विरोधकांनी टीका केली होती फक्त आधार कार्ड दाखवून कुठे साहित्य मिळेल का मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते स्वप्न पाहिले आणि आज ते प्रत्यक्षात अमलात येत आहे अहमदनगर जिल्ह्यात आम्ही रेकॉर्डब्रेक असे काम करणार असून 40 हजार कोटी रुपयांचे समान टप्या टप्प्यात वाटप करणार असल्याचे सुजय विखे यांनी सांगितलं तसेच आज जरी समान वाटप होत असले आणि उद्या काही वस्तू खराब झाल्या तर त्या दुरुस्त करून देण्याची जबाबदारी विखे पाटील फाऊंडेशन घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब आणि जेष्ठ व्यक्तींसाठी अनेक योजना राबविल्या आहेत आणि फक्त घोषणा नाही तर प्रत्यक्ष नागरिकांन पर्यंत कशा पोहचतील याचा पाठपुरावा ते घेत असतात त्यामुळे योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत ते पोहचवण्याच काम आम्ही करत असल्याचं खा डॉ सुजय विखे यांनी सांगितलं ज्या वस्तू या योजने अंतर्गत वाटप होत आहेत त्या चांगल्या दर्जाच्या असून एका वस्तूची खा विखे यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.एलिमको कंपनीच्या माध्यमातून या वस्तू निर्माण करून मोफत देण्यात येत असून नोव्हेंबर 2021 पर्यंत या योजने अंतर्गत 37401 लाभार्थ्यांना वस्तू वाटप करण्यात आले असल्याचं खा विखे यांनी सांगितलं तर आजच्या केडगावच्या शिबिरात 895 लाभार्थ्यांना 70 लाख 54 हजारांचे साहित्य वाटप करण्यात आले
य कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली त्या नंतर दीपप्रज्वलन करण्यात आले
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी यावेळी बोलताना सांगितले की हा कार्यक्रम सेवेचा कार्यक्रम आहे कोणताही राजकीय कार्यक्रम नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे सर्वसामान्यांची सेवा करणे हेच आमचे लक्ष आहे वयोवृध्द लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रकरच्या वस्तू आम्ही नागरिकांना देत आहोत आधी काही गोष्टी बाहेरून मागवून घेत होतो मात्र आता आम्ही स्वतः वस्तू बनवून देत असक्याने स्वदेशी आणि पैशाची बचत या मुळे झाली आहे अनेक चांगल्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करत असून अंध लोकांसाठी स्मार्ट काठी अली असून ती लवकरच वाटप होईल.या योजनेतून पुढील काळात दिव्यांग नागरिकांना स्मार्ट स्कुटर देण्याचा मानस आहे. नरेंद्र मोदी यांचे लक्ष भारतात कुठेही असले तरी त्यांची दृष्टी नेहमी जेष्ठ नागरिकांच्या समस्या कशा सोडवता येतील या कडे असते दिव्यंग व्यक्ती साठी अरक्षणा मध्ये पंतप्रधानांनी चांगले बदल केले आहेत त्यामुळे दिव्यंग व्यक्ती आत्मनिर्भर होईल.
शिक्षण, नोकरी,तसेच खाजगी क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींसाठी मोठे बदल केंद्र सरकराने केले असून त्याचा लाभ त्या व्यक्तींना होत आहे.यु डी आय डी कार्ड दिव्यांग व्यक्ती साठी बनवले जाता असून त्या कार्डामुळे दिव्यांग व्यक्तींना फायदा होईल ज्या मुल मुके बहिरे असतील त्यांच्या साठी केंद्रशासनाच्या माध्यमातून सर्जरी करण्यात येत असून त्यामुळे ते मूल बोलू आणि ऐकू शकतील सुमारे चार हजार मुलांचे असे ऑपरेशन झाल्याचं मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं.
खा सुजय विखे यांचे आभार मानत त्यांचे काम खरंच चांगले असून त्यांनी लाभार्थ्यांची जी आकडेवारी सांगितली ती चकीत करण्या सारखी आहे अनेक लोकांचे आशीर्वाद ते या मद्यमातून घेत असल्याचे मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं.