Home जिल्हा युक्रेन मध्ये जिल्ह्यातील २६ विध्यर्थी जिल्हा प्रशासन करतेय विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना...

युक्रेन मध्ये जिल्ह्यातील २६ विध्यर्थी जिल्हा प्रशासन करतेय विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना बरोबर संपर्क

अहमदनगर २४ फेब्रुवारी
अहमदनगर जिल्ह्यातून १८ विध्यर्थी युक्रेन मधील विविध कॉलेज कॅम्पस मध्ये अडकले असून आम्हाला लवकरात लवकर भारतात घेऊनजा अशी विनंती या विधार्थ्यांनी युक्रेन मधील भारतीय दूतावासा कडे केली आहे.

अहमदनगर मधून डॉक्टर एज्युकेशन कॅन्सल्टनसीचे सीओ डॉ. महेंद्र झावरे पाटील यांच्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून २६ विध्यर्थी युक्रेन मध्ये शिक्षणासाठी गेले आहेत या सर्व विद्यार्थ्यां बरोबर संपर्क झाला असून सर्व विध्यर्थी सुखरूप असल्याचं डॉ झावरे यांनी सांगितलंय.

तर अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले असल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाल करत डॉक्टर झावरे यांच्याशी संपर्क साधून सर्व विद्यार्थ्यांची यादी मागून घेतली आहे २६ विद्यार्थ्यांची यादी असून या यादीमधील विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपर्क साधण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे.

तसेच भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेन मधील भारतीयदुतवासा मधील अधिकाऱ्यांना २६ विद्यार्थ्यांची नावे पाठवून दिली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

डॉक्टर झावरे यांच्यासह अजून काही माध्यमाद्वारे युक्रेन मध्ये विध्यर्थी  गेले आहेत का याबाबतही जिल्हा प्रशासन माहिती घेत आहे 26 विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये अहमदनगर जिल्हा बाहेरील काही विद्यार्थी आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version