Home क्राईम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गोळीबाराची घटना गोळीबारात दोन जण जखमी, भरदिवसा गोळीबार झाल्याने...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गोळीबाराची घटना गोळीबारात दोन जण जखमी, भरदिवसा गोळीबार झाल्याने उडाली खळबळ

बीड दि २५ फेब्रुवारी
बीड जिल्हा पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने आधारला असून हा गोळीबार थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक विभागासमोर झाला आहे. गोळीबार झाल्याची माहीती कळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले असून जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची चर्चा या परिसरात होत असून या गोळीबार मध्ये दोन जण जखमी झाले आहेत. भर दिवसा वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याने काहीवेळ अनेकांना काय झालं हे कळलंच नाही मात्र जेव्हा गोळीबार झाल्याची घटना कळताच याठिकाणी काही वेळ पळापळ झाली होती.

या गोळीबारात एका ईसमाच्या पायाला गोळी लागली असून एक गोळी जमिनीवर लागल्याचं दिसून येतेय पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने पथके रवाना केले आहेत.

फारूक सिद्दीकी आणि क्षीरसागर पूर्ण नाव समजू शकले नाही असे गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या इसमांची नावे आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version