Home जिल्हा रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात निर्मनुष्य रोडवर काही गंभीर घटना घडण्या अगोदरच पोलीस प्रशासनाने...

रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात निर्मनुष्य रोडवर काही गंभीर घटना घडण्या अगोदरच पोलीस प्रशासनाने पर्याय काढावा नाही तर येईल पाश्चातापाची वेळ

अहमदनगर दि २६ डिसेंबर
अहमदनगर शहरात सध्या नगर पुणे रोडवर उड्डाणपुलाचे काम मोठ्या प्रगतीपथावर आहे. मात्र या कामामुळे अहमदनगर शहरातून जाणाऱ्या खाजगी बसेसला रात्री शहरात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतच्या सूचना पोलीस प्रशासनाने काढल्यानंतर रात्री या बसेस शहरात येत नाहीत.मात्र शहरातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि बाहेर गावावरून येणाऱ्यांसाठी पुणे येथील केडगाव बायपास आणि औरंगाबाद रोडवर शेंडी बायपास या ठिकाणी गाड्या थांबवल्या जातात. मात्र रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा आर्थिक दंड सहन करावा लागत आहे. कारण शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतर असल्यामुळे रात्रीच्या वेळी रिक्षा चालक तीनशे ते चारशे रुपये भाडे आकारतात तर याच बरोबर रात्री दोन नंतर व पहाटे गाड्या या ठिकाणी प्रवाशांना उतरवत असल्याने काळ्याकुट्ट अंधारात निर्मनुष्य ठिकाणी काही मोठी गंभीर घटनाही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाड्यांना डीएसपी चौक पत्रकार चौक दिल्ली गेट मार्गे कल्याण रोड ने जाण्यायेण्यासाठी परवानगी दिली तर प्रवाशांना हे सोयीचे होणार आहे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. कारण रात्री अपरात्री काही महिला मुले, मुली एकटा प्रवास करतात अशा वेळी काही गंभीर घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता समोर येत आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने या सर्व याबाबतचा गांभीर्याने विचार करावा एखादी मोठी घटना घडण्या अगोदरच यावर योग्य तोडगा काढावा अशी मागणी आता समोर येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version