Home राजकारण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे वैद्यकीय शैक्षणिक संकुल व धर्मदाय हॉस्पिटल या इमारतींचे भूमिपूजन...

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे वैद्यकीय शैक्षणिक संकुल व धर्मदाय हॉस्पिटल या इमारतींचे भूमिपूजन खासदार सुजय विखे यांच्या हस्ते संपन्न

पाथर्डी – दि. १४ डिसेंबर

पाथर्डी तालुक्यातील येळी येथे संत भगवान बाबा ग्राम विकास संस्था संचलित लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे वैद्यकीय शैक्षणिक संकुल येळी व धर्मदाय हॉस्पिटल या इमारतींचे भूमिपूजन रविवारी सायंकाळी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते झाले .सायंकाळी  समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले. यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, पंचायत समिती सदस्य भगवान आव्हाड, तारकेश्वर गडाचे मठाधिपती आदिनाथ महाराज शास्त्री, येळेश्वर संस्थानचे रामगिरी महाराज आदी उपस्थित होते.संस्थेचे सचिव दत्ता बडे यांनी ऊसतोडणी मजूर, सर्वसामान्यांच्या मुला-मुलींना शिक्षणाची संधी मिळावी मुले-मुली डॉक्टर, इंजिनिअर व्हावेत यासाठी येळी येथे इंग्लिश मीडियम सुरू केले. नंतर खरखंडी परिसराची गरज ओळखून ज्युनिअर कॉलेज चालू केले. सूत्रसंचालन संजय बडे यांनी केले. दत्ता बडे यांनी आभार मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version