Home जिल्हा शहरात सुरू असलेले बीफ विक्री करणारे हॉटेल कोणालाच कसे दिसत नाहीत?

शहरात सुरू असलेले बीफ विक्री करणारे हॉटेल कोणालाच कसे दिसत नाहीत?

अहमदनगर दि.१३ फेब्रुवारी
अहमदनगर शहरात काही परिसरात खुलेआम बीफ
विक्री करणारे हॉटेल सुरू आहेत तशा पाट्याही त्या हॉटेलबाहेर लावल्या जातात मग एकीकडे गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यावर सरकारने बंदी घातली आहे तसा कायदाही केला आहे मग खुलेआम बीफ विक्रीचे हॉटेल कसे आणि कोणाच्या आशीर्वादाने चालू राहतात हा मोठा प्रश्न समोर येतोय.

शहरातील हॉटेल आणि किरकोळ बीफ विक्री करणारे दुकाने खुलेआम सुरू आहेत. मात्र याकडे पोलिस प्रशासन कानाडोळा करताना दिसतंय.

दोन दिवसापूर्वी अहमदनगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या बीफ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आयुक्तांनी दिलेल्या आश्वासना नंतर हिंदुत्ववादी संघटनांनी महानगरपालिकेला काही वेळ दिला आहे.

महानगरपालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत ही अतिक्रमणे काढण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे हिंदुत्ववादी संघटनांनी सांगितले मात्र खुलेआम हॉटेल चालू असताना आणि त्या ठिकाणी बीफ विक्री होत असताना प्रशासन का गप्प आहे हे कळायला मार्ग नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version