साकुरी/ शिर्डी दि.१३ फेब्रुवारी
शहरात मध्यवर्ती ठिकाणी शहरातील सिंधी समाजातील बांधवांकडून व दानशूर भाविकांच्या मदतीतुन १५००स्केअर फुट जागेत भव्य असे झुलेलाल मंदिर उभे करण्यात येत असुन त्यासाठी एक कोटी रुपये खर्च येणार आहे.
६०लाख रूपये खर्चातुन या मंदीराचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती सिंधी समाजाचे अध्यक्ष प्रितम परसवाणी व उपाध्यक्ष गोपीचंद. फुदवाणी यांनी दिलीय या मंदिरात झुलेलाल भगवान यांची मुर्ती साडेपाच लाख रुपये खर्च करून वेतना मार्बल ची बसविण्यात येणार आहे.
साईबाबांसह इतर पाच देवदेवतांच्या मूर्ती देखील बसवण्यात येऊन सिंधी बांधवांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे
प्रितम परसवाणी यांनी सांगितलय.
अध्यक्ष प्रितम परसवाणी म्हणाले की शिर्डी येथे सिंधी समाजातील बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे या अगोदर कमी असणारी जागा पाहता समाजातील एकविचाराने नवीन जागेत सर्व सुविधायुक्त झुलेलाल भगवान यांचे मंदिर असावे अशी मागणी होती त्या अनुषंगाने तात्काळ प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन जागेत या मंदीराचे काम युद्धपातळीवर सुरू असुन दोन मजले व त्यात भव्य आकर्षक लक्षवेधी कळस उभारण्यात आला असून भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या झुलेलाल भगवान यांचे भव्य मंदिर सहा महिन्यांत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या मंदिरासाठी खुपचंद फतणानी, गोवीद गरुर ,सुरेश केसवाणी ,रमेश प्रेमाणी ,ओमप्रकाश प्रेमाणी ,नरेश दादवाणी ,श्याम थावाणी ,कनैह्यालाल माखिजा ,गिरीश मेवाणी ,वासुदेव रोहरा ,प्रेम दादवाणी, विजय ग्वालाणी, जितेश लोकचंदानी आदीसह समाजातील कार्यकर्ते यासाठी प्रयत्न करीत आहेत.