अहमदनगर दि १६ मार्च
बारावी विज्ञान शाखेचा बायोलॉजी विषयाचा पेपर सकाळी परीक्षा आधीच सोशल मीडियावर वायरल झाल्याची खात्री होत आहे ही माहिती मिळाल्यानंतर आवाज महाराष्ट्राने ही बातमी प्रसारित केली होती.
त्याआधी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या बरोबर भ्रमणध्वनीवरून ही माहिती कळवली होती मात्र त्यावेळेस याबाबतची कोणतीही माहिती आपल्याला नसल्याचं अशोक कडूस यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले होते.
बारावी विज्ञान शाखेचा पेपर साडे दहा ते दोन वाजेपर्यंत होता पेपर सुटल्यानंतर सकाळी साडेनऊच्या दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेबाबत बाबत खात्री केली असता सकाळी झालेल्या व्हायरल प्रश्नपत्रिकेचा कोड नंबर आणि दोन नंतर परीक्षा देऊन बाहेर आलेल्या मुलांचा प्रश्नपत्रिकेचा कोड नंबर सारखाच असल्याचं समोर आले असून सकाळी बायोलॉजी चा पेपर फुटला असल्याचा शिक्कामोर्तब झालेला आहे.
शिक्षण विभाग अजूनही याबाबत अंधारात असून पेपर कुठून फुटला कसा फुटला याबाबत अद्यापही त्यांना माहिती मिळालेली नाही.
शिक्षण विभागाला माहिती देऊनही शिक्षण विभाग सुस्तवलेला का ? असा प्रश्न समोर येत आहे वास्तविक पाहता जे मुलं वर्षभर अभ्यास करून आज परीक्षेला जात असतात त्या मुलांच्या परिश्रमावर पाणी पाडण्याचे काम अशा पेपर फुटी मुळे होत असते त्यामुळे शिक्षण विभागाने सकाळीच ही गोष्ट गांभीर्याने घेतली असती तर दिवसभर हा पेपर सोशल मीडियावर फिरला नसता तीन दिवसापूर्वी श्रीगोंदा येथे गणिताचा पेपर फुटल्यानंतर पुन्हा बायोलॉजी चा पेपर व्हायरल होतो याचा अर्थ कुठेतरी शिक्षण विभाग कमी पडतोय हेच या गोष्टींवरून दिसून येतेय.