Home क्राईम गावठी पिस्तुल ,धारदार तलवारी कोयंत्यांसह पंडित, जुन्नी, गॅंग कोतवाली पोलिसांनी केली गजाआड

गावठी पिस्तुल ,धारदार तलवारी कोयंत्यांसह पंडित, जुन्नी, गॅंग कोतवाली पोलिसांनी केली गजाआड

अहमदनगर दि १६ मार्च
अहमदनगर शहरातील आगरकर मळा भागाजवळ गायके वस्ती शेजारी असणाऱ्या पुणे शिर्डी बायपास वरील उड्डाण पुलाच्या खाली कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी पिस्तूलासह तलवारी आणि धारदार हत्यारे जप्त केली आहेत शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.


आगरकर मळा भागात एका टोळी कडे धारदार शस्त्रे असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना कळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपतराव शिंदे यांनी ,पोसई मनोज महाजन व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांच्या सह सदर ठिकाणी जावुन छापा टाकला असता पोलिसांना पाहून मोटार सायकल वर पळुन जात असताना पोलिसांनी पाठलाग करून सुनिलसिंग जितसींग जुन्नी वय २७ वर्ष २) आझाद लक्ष्मण शिंदे वय २३ वर्ष ३) शंकर अशोक पंडीत वय ३२वर्ष ४) सागर दिनेश बिनोडे वय २६ वर्ष ५) आकाश अगस्तीन आढाव वय २२ वर्ष सर्व रा संजयनगर काटवनखंडोबा अ नगर व ६) संतोष रमेश पंडीत वय २५ वर्ष रा सागर कॉम्पलेक्स आगरकर मळा स्टेशन रोड अ नगर यांना पकडले मात्र या वेळी त्यांचे आणखीन दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.

या पकडलेल्या आरोपिकांडून ३५,४५०/- रु किंमतीचा गावठी बनावटीचा स्टीलचा कट्टा,एक मॅगझीन व १ जिवंत काडतुसे व ४५० रु कि.अंदाजे २) ९५,६५०/- रु अंदाजे किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या एक लोखंडी चाकु व रोख रक्कम, एक REDCOP नावाचा लाल मिर्ची पावडरचा स्प्रे बाँटल, कापडाच्या तुकड्यात गुंडाळलेली दोन लोखडी तलवार, लाकडी मुठ असलेले२ कोयते, २५० ग्रॅम वजणाची लाल रंगाची मिर्ची पावडर अशी शस्त्रे आणि दरोडा टाकण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संपतराव शिंदे व गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज महाजन, पोना गणेश धोत्रे , पोना सलिम शेख , पोना नितीन शिंदे, पोना सागर पालवे, पोना संतोष गोमसाळे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना योगेश कवाष्टे, पोना राजु शेख, पोकॉ अभय कदम, पोकॉ दिपक रोहकले, पोकॉ सोमनाथ राउत, पोकॉ अमोल गाढे, पोकॉ अतुल काजळे,पोकॉ संदिप थोरात पोकॉ याकुब सय्यद यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version