Home Uncategorized शिवजयंती मिरवणूक नायक नहीं खलनायक हूं मैं आणि आ आँटे आंमलापुरंम् गाण्यावर...

शिवजयंती मिरवणूक नायक नहीं खलनायक हूं मैं आणि आ आँटे आंमलापुरंम् गाण्यावर थिरकत मिरवणूक संपली

अहमदनगर दि 20 फेब्रुवारी
महाराष्ट्रात आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९२वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा म्हणूनच त्यांनी शेवटपर्यंत आपले कार्य केले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पहिला तर त्यांनी नेहमीच आपल्या मावळ्यांसोबत आपले दिवस घालवले स्वराज्य स्थापन करण्यासाठी गड किल्ले बांधले अठरापगड जातीच्या समाजाला घेऊन रयतेचे स्वराज्य निर्माण केले मात्र आज ३९२ वर्षे होऊनही त्यांच्या नावाची जादू अद्यापही कायम आहे.

आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राज्यकर्ते राजकारण करतात आणि सत्तेवर येतात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आजची तरुण पिढी कधी अमलात आणेल हा एक मोठा प्रश्न आहे.

नगर शहरातही आज ठीक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली अनेक मंडळांनी विविध कार्यक्रम राबवले, रक्तदान शिबिर, अन्नदान, शिवछत्रपती महाराजांचे विचार व्याख्याने देऊन चांगल्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.


मात्र सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीत “नायक नहीं खलनायक हूं मैं”आणि “आ आँटे आंमलापुरंम्” गाण्यावर तरुणाई थिरकत होती तर गाणे बंद झाल्यावर डीजे चालकाच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहताना दिसत होती आणि पुन्हा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अपमान केला जात होता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार अमलात आणल्या शिवाय स्वराज्य आणि सुराज्य निर्माण होणार नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर चित्रपटातील गाणे लावून हिडीस गाण्यावर नाचून पुढे काय मिळवणार आणि पुढच्या पिढीवर काय आदर्श ठेवणार हाच मोठा प्रश्न पडतोय.

 

मध्यंतरी अहमदनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती नूतनीकरणाचे वेळेस चित्रपटातील गाणे लावण्यावरून बरेच राजकारण झाले होते त्यामुळे या शिवजयंतीला चौकाचौकात फक्त पोवाडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र बद्दलची माहिती सांगणारे व्याख्याने ऐकू येतील असं वाटलं होतं मात्र मागील वेळी टीका करणारे तेच लोक चित्रपटाच्या गाण्यावर नाचताना दिसल्यामुळे सगळे एकाच माळेचे मणी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांचे आचार विचार अमलात आणण्यासाठी नव्हे तर फक्त चित्रपटातील गाणी लावून गर्दी जमवणे आणि नाचगाणे करण्यासाठी आहे का हा प्रश्न समोर येतोय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version