कर्जत प्रतिनिधी
- पुण्यात मोटरसायकल चोरी करून कर्जत मध्ये वावरणारा अट्टल गुन्हेगार विजय हलगुंडे याला कर्जत पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. कर्जत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथुन मोटारसायकल चोरी करून कर्जत शहराजवळ वास्तव्य करणार्या एका इसमा जवळ चोरीची मोटरसायकल असून सध्या कर्जत मध्ये वास्तव्यास आहे त्यानुसार पोलिसांनी टाकळी खंडेश्वरी या ठिकाणी छापा टाकून महादेव हुलगुंडे यास ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडून बजाज पल्सर गाडी मिळून आली ही गाडी त्याने पुणे येथील दगडूशेठ गणपती मंदिर शेजारी पार्किंग मधून चोरी केली असल्याचं कबूल केलअसून त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या आरोपीकडून अजूनही काही मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ही कामगिरी कर्जत चे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर ,श्याम जाधव सुनील खैरे,गोवर्धन कदम यांनी केली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी कर्जत पोलिसांच या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.सुथो