अहमदनगर दि २० एप्रिल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया ताई सुळे आज अहमदनगर दौऱ्यावर असताना त्यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती आणि माळीवाडा वेशी समोरील शनि मारुती मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले.
पहा व्हिडीओ
श्री विशाल गणपती मंदिरात खासदार सुप्रिया सुळे ताई सुळे आल्या असताना मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती कारण आज अंगारकी चतुर्थी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणावर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत उभे होते सुप्रियाताई सुळे आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी भाविकांना बाजूला होण्यास सांगितले मात्र सुप्रियाताईंनी हे पाहताच सर्वांना हाताने खुणावत आधी भाविकांना दर्शन घेऊन द्या त्यानंतर आपण दर्शन घेऊ असे म्हणून त्यांनी स्वतः पुढे होत काही महिलांना हाताने धरून पुढे नेले त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या महिलांना एक सुखद धक्का बसला खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी कोणताही बडेजाव न दाखवता आधी महिला भक्तांना दर्शन घेऊन दिले आणि नंतर मग स्वतः त्यांनी श्री विशाल गणपती चे दर्शन घेतले त्यांच्या हा साधेपणा अनेक भाविकांना भाऊन गेला.