अहमदनगर दि.१ एप्रिल
आयपीलची सुरुवात झाल्याने सध्या सर्वच ठिकाणी उत्साह दिसून येत आहे मोठं मोठ्या स्क्रीन समोर बसून मद्य रिचवत अनेक जण सामन्यांचा आस्वाद घेत आहेत आणि मोबाईल वरून सट्टेबाजी करत लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे हरला तर गम मध्ये आणि जिंकला तर आनंदाच्या भारत ग्लास भरत आहे.
सट्टेबाजी मध्ये कोण अडकतो तर सर्वात मोठं सावज तरुणपिढी असून त्यात व्यापारी जास्त फसतात रात्रीतून करोडो रुपयांची उलाढाल होत असताना कोणालाच काही समजत नाही असं नसत मात्र झोपायचा सोंग घेणाऱ्याला कोणीच उठवू शकत नाही असं शहरात वातावरण असून उन्हाचा पारा वाढत असल्याने सर्वचजण पर्वताच्या सावलीला पळताना दिसतायेत करण त्याच्याकडे बोलका पोपट असल्याने भविष्यवाणी तिथेच होते.
तर दुसरीकडे आशा टॉकीज ठेप्यात जुनी जाणती माणसे पुन्हा सक्रिय झाली असून यात सर्वात पुढे जुना जनता वी पुढे असतो तो बकरे पकडून आणतो आणि पुढच्यांकडे सोपवतो मग त्या बकऱ्याला पाणी पाजण्या पासून कापण्याचे काम दुसरे दोन जण करत आहेत. दोन दिवसापूर्वी धीरूभाईच्या गोलंदाजीवर कमी रण मिळाल्याने कप्तानने एकाला चांगलीच सुनावली मोठा बकरा असताना कमी रण निघाल्याने कप्तान संतापले होते.
यादी मधील सर्वनाच निरोप गेल्याने सर्वांनी इनामे इतबारे पाकीट पोहच केले आहेत तर काहींनी बाहेरगावचा रस्ता धरला आहे. जे अजून ठेप्यावर आले नाही त्यांचा शोध सुरू असून डोळ्यात तेल घालून वी आणि भय जोरात बुलेट वर शहरात गस्त घालत असतात त्यामुळे अशा टॉकीज ठेप्यात दोन गट पडले असून एक गट चांगलीच बॅटींग करत आहे तर दुसऱ्या गटाला फक्त फिल्डिंग करायचे कामे मिळत आहे त्यामुळे थोडीफार धुसफूस सुरू आहे.
फमु चौकातील मायेच्या पर्वता खाली सध्या हंगामाची मजा घेण्यासाठी आशा टॉकीज ठेप्यावर मोठी सावली टाकली असल्याबे त्या पर्वताला कोणीच हात लावणारा नाही म्हणून त्याने आपले काम दुपट्टीन वाढवले आहे मात्र पर्वताची सावली एक दिवस गायब होणार असून त्यासाठी पर्वत फोडण्याचे काम सुरू आहे मोठ्या पर्वताच्या खाली टाइम बॉम्ब लागला असून टाईमावर हा बॉम्ब फुटणार हे नक्की करण त्या बॉम्बचे रिमोट बहरेच्या लोकांकडे आहे .
सावेडीच्या दोषी जोरात असून तोही पर्वता सारखाच जोरात सट्टेबाजी करत आहे लाखाच्या पुढेच आकडा असून ये अंदर का मामला है म्हणत सावेडी परिसरात चांगलाच उधळत आहे .
या सर्व सट्टेबाजीचा खेळ तरुणांना देशोधडीला लावणारा असून थोड्या मोहापायी तरुण पिढी या सट्टेबाजीच्या मोहपशात अडकत चालली आहे तर अशा प्रवृत्तीना आळा घालण्या ऐवजी आशा धंद्यांना राजकीय सरकारी संरक्षण मिळत असल्याने पर्वता सारखी सावली मोठं मोठी होत चालली असून ही सावली तरुण पिढीला नाश करत आहे अशा लोकांना वेळीच रोखले नाही तर बरबादी तुमच्या आमच्या घरा पर्यंत पोहचायला वेळ लागणार नाही.