अहमदनगर दि.१ –
शुक्रवार दि.१-४-२०२२ रोजी शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुळानगर, विळद पंपींग स्टेशन येथे वीज वितरण कंपनीकडून होणा-या विदयुत पुरवठयामध्ये बिघाड निर्माण झाल्याने दुपारी ३.०० ते ३.३० वाजलेच्या सुमारास वीज पुरवठा खंडीत झालेला होता. पर्यायाने मुळानगर, विळद येथून होणारा पाणी उपसा बंद झालेला होता. सदरचा वीज पुरवठा सुरु झालेनंतर
पाणीपुरवठा केंद्र वसंत टेकडी येथे सायंकाळी ५.०० च्या सुमारास पूर्ण दाबाने पाणी आले. वीज पुरवठा सुरु झाल्यानंतर मुळानगर व विळद पंपींग स्टेशन येथून टप्प्या टप्प्याने पाणी उपसा सुरु करण्यात येतो व पाणीपुरवठा केंद्र वसंत टेकडी येथे पूर्ण दाबाने पाणी येणेस सुमारे २.०० तासाचा अवधी लागतो. प्राप्त परिस्थितीत वीज पुरवठा बंद असल्याने शहर पाणी वितरण व्यवस्थेच्या टाक्या भरणेस अडचणी निर्माण झालेल्या आहेत. खंडीत वीज पुरवठयामुळे मुळानगर, विळद येथून होणारा पाणी उपसा पूर्णतः बंद पडल्याने शुक्रवार दि.१-४-२०२२ रोजी पाणी वाटप चालू असलेल्या भागास व दि.२-४-२०२२ रोजी पाणी वाटप असलेल्या भागांमध्ये उशिरा व कमी दाबाने नेहमीच्या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येईल. तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
*