अहमदनगर दि.३ जानेवारी
सध्या तरुणाई सोशल मीडियावर जास्त व्यस्त असते आणि याचाच फायदा घेत अनेक खोटे ॲप फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा काम काही सोशल माडीया हॅकर्स करत असतात. नकळत फेसबुक आणि व्हाट्सआप च्या माध्यमातून ते आपल्याला जाळ्यात ओढतात आणि मग बदनामी च्या भीतीने आपले बँक खाते रीकामे होत राहते.
काही तरुणांनी धाडस करून पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रारी केल्या आहेत मात्र अजूनही असे ॲप फेसबुक वर आपल्याला नकळत दिसत असतात आणि त्यात अनेक तरुण फसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर वावरताना अत्यंत काळजीपूर्वक वावरणे गरजेचे आहे अन्यथा अशा फसवे ॲप डाऊनलोड करून आपला खिसा रिकामा होऊ शकतो तसेच समाज माध्यमात आपली प्रतिमा खराब होऊ शकते.
सावधान असे ॲप डाऊनलोड करू नका आणि आपले बँक खाते रिकामी करू नका. नकळत आपण फसला असाल तर थेट पोलिसांचे संपर्क करा