पिंपरी चिंचवड दि.२ जानेवारी
हॅलो मी तुमच्या आयुक्तांचा खबरी बोलतोय असे फोन करत पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या खात्यावर पैसे टाका आणि मी तुम्हाला गुन्हेगारांची माहिती पुरवतो असे खोटे सांगून पोलिसांनाच ठकवणाऱ्या तोतया पोलीस आयुक्त विजयसिंह उर्फ खलीलुल्लाह आयनुल्ला खान याला पिंपरी चिंचवड(Pimpri Chinchwad) पोलिसांनी मुंबईत बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांना फसवण्याचे अनेक गुन्हे त्याच्यावर यापूर्वी दाखल झाले आहेत.
गोरेगाव, मलाड ओशिवारा पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल असून आता त्याने थेट पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash)यांचे नाव सांगून पिंपरी पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा हा डाव फसला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला पिंपरीच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या चाणाक्षपणा मुळे हा भामटा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मी तुमचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा खबरी असून बेकायदेशीर हत्यारांचे विक्री करणाऱ्या टोळीचा पत्ता तुम्हला देतो त्या बदल्यात माझ्या गुगल पे वर काही रक्कम टाका असे फोन त्या ठाकसेनाने केल्या नंतर याबाबत पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना संशय आला.पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी या भामट्याला शंका येऊ नये म्हणून त्यांनी केलेल्या मागणी प्रमाणे ऑनलाइन माध्यमाद्वारे त्याच्या अकाउंट वर 28 हजार रुपये जमा केले होते. त्यानंतर हा भामटा अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
पैसे दिल्या नंतर गुगलपे द्वारे त्याचा शोध घेतला असता तो मुंबई ते असल्याचा कळाल्यानंतर पिंपरी चिंचवडच्या पोलिसांनी थेट मुंबई येथील गोरेगाव येथून त्याला अटक केली आहे. खलिउल्लाह अयानुल्ला खान (वय ४२, रा. जोगेश्वरी पश्चिम, मुंबई) असे या ठकसेनाचे नाव असून त्याने याआधी अहमदाबादचे पोलीस आयुक्त विजयसिंह असल्याची बतावणी करून अनेक पोलिस अधिकाऱ्यांकडून पैसे उकळले होते. 2015 पासून तो अशाप्रकारे गुन्हे करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून अनेक पोलिस अधिकाऱ्यांना त्याने लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
पिंपरी-चिंचवडचे आयुक्त कृष्णप्रकाश यांनाही त्या ठकसेनाने अनेक वेळा फोन केले होते. मात्र ते फोन कृष्णप्रकाश यांनी रिसिव्ही केले नसल्याने त्याने इतर अधिकाऱ्यांनाही फोन करून माहिती देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली होती.