Home शहर २८ मार्चला फडकणार अखंड भारतातील पहिला ७२ फूट उंच आणि २० फूट...

२८ मार्चला फडकणार अखंड भारतातील पहिला ७२ फूट उंच आणि २० फूट रुंद जैन समाजाचे प्रतीक असलेला पंचरंगी ध्वज

अहमदनगर दि २४ मार्च (सुशील थोरात)

अहमदनगर शहरातील सकल राजस्थानी युवा व महिला मंचच्या वतीने शहरात विविध सामाजिक ,सांस्कृतिक,लोकउपयोगी उपक्रम राबवले जात असून आता या सकल राजस्थानी युवा व महिला मंचच्या वतीने ७२ फूट उंच ध्वज स्तंभावर २० रुंद जैन समाजाचे
प्रतीक असलेले पंचरंगी ध्वज उभारण्यात येणार आहे.
आनंदऋषीजी महाराज साहेब यांच्या स्मृती स्थळाजवळ असणाऱ्या मगनमुनी महाराज समाधी स्थळासमोर हा ध्वज उभारण्यात येणार आहे.

७२ फुटी ध्वजस्तंभ उभारण्याचे काम पूर्ण झाले असून २८ मार्च म्हणजेच आनंदऋषींजी महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी या दिवशी सकाळी ८ वाजता २० फुटी रुंद पंचरंगी ध्वज फडकवण्यात येणार आहे.

जैन समाजाचे प्रतीक असलेला हा सर्वात मोठा ध्वज पहिल्यांदाच नगर शहारत फडकणार असून ही सर्व जैन समाज बांधवांसाठी अभिमानाची बाब आहे.

या कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी जैन बांधवसह केली असून या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभले आहे या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन सकल राजस्थानी युवा व महिला मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version