Home क्राईम पोलिसांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी केलेली युक्ती पाहून...

पोलिसांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी केलेली युक्ती पाहून अचंबित व्हाल

प्रतापगड, २४ मार्च – (सुशील थोरात)

उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे बलात्कार करून फरार झालेल्या एका आरोपीला पोलिसांनी अवघ्या दोन तासात पकडलंआहे. रेल्वे स्टेशनच्या सार्वजनिक शौचालयात महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला सरेंडर करण्यासाठी पोलिसांकडून सर्व प्रयत्न करण्यात आले होते. यानंतर तो शरण येत नसल्याने पोलिसांनी वेगळाच निर्णय घेतला. ते आरोपीच्या घरासमोर बुलडोजर घेऊन पोहोचले. पुढील 24 तासात शरण आला नाही तर घर पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता

अधिकाऱ्यांनी आरोपीच्या कुटुंबीयांना पुढील 24 तासांत आत्मसमर्पण न केल्यास त्यांचे घर पाडण्यात येईल, असा इशारा दिला. या धमकीचा परिणाम असा झाला की अवघ्या दोन तासांनंतर शहरात आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली. प्रतापगड पोलिसांची ही कार्यपद्धती सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली असून, प्रत्येक गुन्हेगाराला अशी वागणूक दिल्यास राज्यातील कोणीही चूक करण्याची हिंमत करू शकणार नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version