Homeराजकारणपहिला निकाल लागला.. शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच

पहिला निकाल लागला.. शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच

advertisement

मुंबई दि.१० जानेवारी
महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवणाऱ्या आणि खळबळ उडवणाऱ्या प्रकरणाचा निकाल अखेर लागला असून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातील 14 आमदार अपात्र ठरणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून होते आता प्रकरणाचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला असून या निकलात सुरवातीला शिवसेना कोणाची या बाबत निर्णय देण्यात आला .

शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर पक्षाच्या दोन्ही गटांनी म्हणजेच शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या गेल्या होत्या.या पक्ष फुटीच्या प्रकरणात आतापर्यंत दोन लाखांहून अधिक पुराव्यांची कागदपत्र दाखल करण्यात आली होती. आमदार आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे कर्मचारी विजय जोशी, शिंदे गटाचे आमदार दिलिप लांडे, आमदार योगेश कदम, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष आणि उलट तपासणी घेण्यात आली होती.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल आज लागला आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या या निकालामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडली. या प्रकरणात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. प्रत्येक याचिकेची स्वतंत्र सुनावणी झाल्यास विलंब होईल म्हणून याची विभागणी सहा गटात करण्यात आली होती. यामुळे याचिकांच्या या सहा गटांचे सहा स्वतंत्र निकाल वाचून दाखवले गेले.या सुनावणीसाठी दोन्ही गटाचे याचिकाकर्ते आणि वकिल उपस्थित होते.

सुरुवातीला शिवसेना कोणाची यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन केले. शिवसेनेमध्ये 2018 मध्ये निवडणूक झाली नाही. तसेच उद्धव ठाकरे यांनी दिलेली पक्षाची घटना राहुल नार्वेकर यांनी अमान्य केली. 2023 ला निवडणूक आयोगाने दिलेली घटना राहुल नार्वेकर यांनी मान्य केली. दोन्ही गटांकडून घटना प्राप्त झाली नाही मात्र निवडणूक आयोगाची घटना मान्य करण्यात आली ही घटना 1999 साली बनवण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढने पक्षाच्या घटनेत नव्हते पक्षप्रमुख कोणालाही तडका फडकी पक्षातून काढण्याचा अधिकार नव्हता जोपर्यंत राष्ट्रीय कार्यकारणीशी चर्चा होत नाही तोपर्यंत कोणाचीही हकलपट्टी होऊ शकत नाही. कार्यकारिणीची चर्चा होऊनच हा निर्णय घेतला गेला पाहिजे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी अमान्य करण्यात आली. पक्ष कोणाचा आहे हे ठरण्याचा अधिकार बहुमताचा असतो केवळ ठाकरे म्हणाले म्हणून तसे होऊ शकत नाही. शिवसेनेच्या घटनेत लिहले गेले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे अनेक युक्तिवाद यावेळी नाकारण्यात आले आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालात सांगितले आहे त्यामुळे आता शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या हातात आल्याचे अधिकृत शिक्का मोर्तब झाले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular