अहमदनगर दि.२९ नोव्हेंबर
अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 261/अ/1 ही ४ एकरची जमीन महानगरपालिका स्मशानभूमी आणि दफनभूमी साठी घेण्याचा ठराव महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला गेला आहे या ठरावाच्या विराधात महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत जेष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी विरोध केला मात्र त्यांच्या विरोधाला डावलत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला याच सर्वसाधारण सभेत नगरसेवक बाळासाहेब बोराटे नगरसेवक अमोल येवले नगरसेवक मदन आढाव यांनी लेखी विरोध नोंदवला होता मात्र तरीही हा ठराव पास करण्यात आला होता त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सध्या जोरात सुरू आहेत.
32 कोटी रुपयांच्या या ठरावाबाबत आता नगरसेवक विरोधात उतरत असून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक प्रदीप परदेशी, नगरसेवक शेख नजीर अहमद, नगरसेवक संग्राम शेळके, नगरसेवक अक्षय उनवणे, नगरसेवक खान समद हाजी वाहब, नगरसेवक कुरेशी परविन अबीद तसेच शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन देऊन या 32 कोटी रुपयांच्या जमीन घेण्याबाबतच्या ठरावाला विरोध दर्शवला असून जी जागा महानगरपालिकेची आरक्षण केलेली आहे ती जागा ताब्यात घ्यावी नवीन जागा विकत घेण्याबाबत कार्यवाही करू नये अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे. हळूहळू विरोध करणाऱ्या नगरसेवकांची संख्या आता वाढू लागली आहे.