अहमदनगर दि.४ जानेवारी
पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या कामाच्या झंजावाता मुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ख्याती झाली आहे . ज्यावेळेस कोरोनाच्या भितीमुळे आपला माणूस आपल्या पासून दूर चालला होता त्या काळात आमदार निलेश लंके यांनी भव्य दिव्य असेल सेंटर उभारून कोरोना रुग्णांना मायेचा आधार दिला होता.
त्यानंतर राजकारणातही त्यांनी कामाच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवला आहे निलेश लंके यांना भेटण्यासाठी मतदारसंघासह ते जिथे जिथे जातील तिथे माणसे आतुरतेने आणि आपुलकीने त्यांची भेट घेत असतात त्यांची ओळख आता आमदार नव्हे तर आपला कामाचा माणूस अशी झाली आहे.
आमदार लंके नुकतेच वैष्णोदेवी साठी जम्मू कश्मीर येथे गेले असताना अहमदनगर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील जम्मू कश्मीर मध्ये कार्यरत असलेल्या लष्करातील जवानांना सुद्धा त्यांची भेट घेण्याचा मोह आवरला नाही अकोळनेर येथील भुषण शेळके, देहरे येथील वशीम शेख, नारायणगव्हाण येथील संदिप शेळके व सातारा जिल्ह्यातील कुमार पोळ यांनी जम्मू काश्मीर येथील कटारा येथे आमदार लंके यांची भेट घेऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या परक्या राज्यात आपला माणूस जेव्हा भेटतो तेव्हा एक वेगळेच आपुलकी निर्माण झालेली असते.
आमदार निलेश लंके यांनी त्यांची विचारपूस करून मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्यापैकी वशीम शेख यांना सैन्यदलात सुभेदारपदी बढती मिळाल्या बद्दल सत्कार करून त्याला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात तर जागोजागी आमदार निलेश लंके त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत असतेच मात्र थेट जम्मू-काश्मीरमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील कार्यरत असल्या लष्करातील अनेक जवानांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या कार्याचं कौतुक केलं.