अहमदनगर दि.१४ एप्रिल
अहमदनगर शहरातील कापडबजार परिसरात दीपक नवलानी ,प्राणिल बोगावत या दोन व्यवसायिकांवर हल्ला झाला असून किरकोळ कारणांनी हा हल्ला झाल्याची घटना घडली आहे या दोन्ही व्यापाऱ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हा रुग्णालय बाहेर व्यापाऱ्यांची मोठी गर्दी जमली आहे तर कापड बाजारातील व्यापाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने काही मार्ग बंद करण्यात आले होते हे मार्ग बंद करण्यात आल्यानंतर एका दुकानाजवळ पत्रा काढण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचं प्रथम दर्शनी समोर आले आहे