अहमदनगर दि.१४ एप्रिल
अहमदनगर शहरातील कापडबजार परिसरात दीपक नवलानी प्राणिल बोगावत या दोन व्यवसायिकांवर हल्ला झाला असून किरकोळ कारणांने हल्ला झाल्याची घटना घडली आहे .या दोन्ही व्यापाऱ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र दीपक नवालनी यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने साईदीप हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले ही घटना कळतात आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने साईदीप हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन दीपक नवालनी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन डॉक्टरांशी दीपक नवालनी यांच्या प्रकृती बाबत चर्चा केली .
ही घटना घडल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती तसेच ज्या प्रकरणातील आरोपींना तातडीने पकडावे अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना व्यापाऱ्यांनी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे स्वतः जिल्हा रुग्णालयात तळ ठोकून असून नागरिकांना त्यांनी शांततेचे आवाहन केल आहे.