Home विशेष  3 हजार विध्यार्थ्यांची ३५० फुटांचा तिरंगा हातात घेत शहरातून जनजागृती रॅली,सागर इंगळे...

 3 हजार विध्यार्थ्यांची ३५० फुटांचा तिरंगा हातात घेत शहरातून जनजागृती रॅली,सागर इंगळे यांनी टिपले ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून नायनरम्य दृश्य 

अहमदनगर दि.१३ ऑगस्ट

स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’
अभियानांतर्गत रेसिडेन्सिअल विद्यालयातील ३ हजार
विद्यार्थ्यांनी ३५० फुटांचा तिरंगा हातात घेत शहरातून जनजागृती रॅली काढली.

स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आझादी काअमृतमहोत्सवचा भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. यानिमित्त शाळा, महाविद्यालयात रोज विविधसांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून रेसिडेन्सिअल विद्यालयातील ३ हजार विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.

नगर शहरातील जेष्ठ छायाचित्रकार सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनधी दत्ता इंगळे यांचा मुलगा सागर इंगळे याने ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने या भाव्यदिव्य रॅलीचे चित्रण केले असून अत्यंत नयनरम्य असे दृश्य उंच कॅमेऱ्याच्या साह्याने टिपण्यात आले आहे.

https://youtu.be/XSDaRXHOQ1I

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी चव्हाण, जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रा. ह. दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे, विश्वस्त मुकेश मुळे, जयंत वाघ, रेसिडेन्सिअलचे प्राचार्य विजयकुमार पोकळे आदींनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. ३५० फूट लांबीचा तिरंगा विद्यार्थ्यांनी हातात घेतला होता. हा झेंडा लक्षवेधी ठरला. रॅलीत रेसिडेन्सिअल विद्यालयाचे पाचवी ते बारावीपर्यंतचे सुमारे ३ हजार विद्यार्थीसहभागी झाले होते. विद्यालयापासून निघालेली ही रॅली लाल टाकी, सर्जेपुरा, कापडबाजार, चितळेरोड, चौपाटी कारंजा, दिल्लीगेटमार्गे पुन्हा विद्यालयात दाखल झाली. या रॅलीतून विद्यार्थ्यांनी घर झेंडा अभियानाबाबत जनजागृती देशभक्तिपर भारतमातेच्या जयघोषाने नगर शहर दुमदुमले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version