Homeराजकारणभाजप कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांना मानणारा पक्ष... त्यामुळे मला उमेदवारी मिळण्याबाबत भाजपकडून...

भाजप कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांना मानणारा पक्ष… त्यामुळे मला उमेदवारी मिळण्याबाबत भाजपकडून पूर्ण विश्वास – सोनाली झोटिंग

advertisement

अहिल्यनगर दिनांक 12 नोव्हेंबर :

आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवारी संदर्भात भाजपचे ओबीसी मोर्चाचे सावेडी मंडल अध्यक्ष वैभव झोटिंग यांच्या पत्नी सोनाली झोटिंग यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

Oplus_131072

भाजप पक्षाकडून मी प्रबळ दावेदार असून मलाच पक्षाकडून तिकीट मिळणार आहे असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

प्रभागातील पारंपारिक प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत त्यासाठी मी उमेदवारी करावी अशी मागणी जनतेमधून होत आहे. आता सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवेल पण मी थांबणार नाही असेही त्या म्हणाल्या वीस वर्षापासून माझे पती वैभव झोटिंग भाजप पक्षाशी एकनिष्ठ आहेत. भाजप घराणेशाहीला मानणारा पक्ष नाही त्यामुळे मला उमेदवारी संदर्भात भाजपकडून पूर्ण विश्वास आहे. २०१९ साली भाजपचे चांगले वातावरण असतानाही भाजपचा उमेदवार पराभूत झाला त्यामुळे यावेळी उमेदवार निवडून आणायचा असेल तर पक्षाला मलाच उमेदवारी द्यावी लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सौ. झोटिंग पुढे बोलताना म्हणाल्या की माझ्या पतीला गेल्या १० वर्षात पक्षाने जबाबदारी दिली ती पार पाडली आहे त्यामुळे यावेळेस पक्ष आपल्या पतीला आणि मला न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular