Homeशहरशालेय मनपा जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत साई एंजलचे वर्चस्व; १६ खेळाडूंची विभागीय...

शालेय मनपा जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत साई एंजलचे वर्चस्व; १६ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

advertisement

अहिल्यानगर : मनपा जिल्हास्तरीय शालेय थाई बॉक्सिंग स्पर्धेत साई एंजल इंटरनॅशनल स्कूल, अहिल्यानगरच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत १३ सुवर्ण आणि ३ रौप्य अशी एकूण १६ पदके पटकावली. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळेच्या सर्व १६ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.

मुलांच्या गटातील पदक विजेते
अर्णव राजपूत – ३६ किलोखालील गट (सुवर्ण)
प्रदनेश जोशी – ४० किलोखालील गट (सुवर्ण)
आर्य सिनारे – ४४ किलोखालील गट (सुवर्ण)
शौर्य करमुंगे – ४८ किलोखालील गट (सुवर्ण)
शंभुराजे सावंत – ६० किलोखालील गट (रौप्य)
विरेन आधाट – रौप्य पदक
हर्षवर्धन घोरपडे – ६५ किलोखालील गट (रौप्य)
रोनक चव्हाण – ६० किलोखालील गट (सुवर्ण)
सार्थक गुंड – ७० किलोखालील गट (सुवर्ण)
आर्यन नवघरे – ४८ किलोखालील गट (सुवर्ण)
मुलींच्या गटातील पदक विजेत्या
स्वराली बुधवंत – ४० किलोखालील गट (सुवर्ण)
अनन्या मोरे – ४० किलोखालील गट (सुवर्ण)
स्वरा सिनारे – ४४ किलोखालील गट (सुवर्ण)
राजनंदिनी कुलथे – ६० किलोखालील गट (सुवर्ण)
सिद्धा तांबोळी – ६५ किलोवरील गट (सुवर्ण)
संस्कृती पवार – ५६ किलोखालील गट (सुवर्ण)

या यशस्वी कामगिरीमागे शाळेच्या मुख्यध्यापिका सौ.पल्लवी जोशी मॅडम, ॲडमिन स्वप्निल म्हात्रे सर,
क्रीडा मार्गदर्शक स्वप्निल वारुळे सर,थाई बॉक्सिंग असोसिएशन, अहिल्यानगरचे सचिव तथा क्रीडा शिक्षक गौरव घोडके सर आणि अध्यक्ष तथा क्रीडा शिक्षक जयेश शिरसाठ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सर्व खेळाडूंच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे फलित असून, विभागीय स्पर्धेतही हे खेळाडू अशीच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

साई एंजल इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन!

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular