अहिल्यानगर दिनांक २२ नोहेंबर
नगर शहरात मसाज पार्लरच्या नावाने अनेक ठिकाणी अनेक घाणेरडे प्रकार सुरू असून मसाज पार्लर स्पा आयुर्वेदिक नावाने हा गोरखा धंदा सुरू आहे.
नगर शहरातील पाईपलाईन रोड नगर मनमाड रोड वरील झोपडी कॅन्टींग परिसर तसेच पुढे डौल हॉस्पिटल या ठिकाणी स्पा मसाज पार्लरच्या नावाने काय सुरू आहे याचा शोध आता पोलिसांनी घेणे गरजेचे आहे. संपूर्ण नगर शहराला तेथे काय चालू आहे हे माहित आहे मात्र पोलिसांना याबाबत माहिती कशी नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या ठिकाणी काम करण्यासाठी बाहेर राज्यातून मुली आलेल्या असून काही मुली शेजारच्या देशातून आल्याची माहिती आहे मात्र या ठिकाणी जाऊन पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे.

उच्चभ्रू वस्तीत असलेल्या झोपडी कॅन्टीन परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेगळाच धंदा सुरू असून त्याचप्रमाणे पाईपलाईन रोडवर सुद्धा चांगल्या लोकवस्तीत भाग आहे. मात्र याठिकाणी स्पा मसाज पार्लरच्या नावाने सुरू असलेल्या धंद्यामुळे या भागाचे नाव खराब होत असून याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का किंवा त्यांना या गोष्टी माहीतच नसाव्यात असाही म्हणावे लागेल.
विशेष म्हणजे हे मसाज चालवण्यासाठी अहिल्या नगर शहराच्या आजूबाजू असलेल्या पुणे आणि नाशिक मधून अनेकांनी फ्रांचायसी दिल्या आहेत तर काहींनी या ठिकाणी येऊन मसाज पार्लर सुरू केले आहे. अनेक मुली सध्या बाहेर राज्यातून नगर शहरात आले असून शहरातील बाजारात फिरतानाही या मुली दिसत आहेत नेमका या मुली परराज्यातील आहेत का ? परदेशातील आहे याचा तपास होणे गरजेचे आहे.





