Homeराजकारणशंखनाद परिवर्तनाचा...मनसेचे प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार सुमित संतोष वर्मा यांच्या प्रचाराचा...

शंखनाद परिवर्तनाचा…मनसेचे प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार सुमित संतोष वर्मा यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी होणार..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 4 जानेवारी

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाल्या असून आता प्रभाग क्रमांक 11 चे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार सुमित संतोष वर्मा यांच्या प्रचार फेरीचा शुभारंभ सोमवारी सकाळी साडेदहा वाजता गंजबाजार येथील सोमेश्वर महादेव मंदिर येथून होणार आहे. प्रभागातील सर्वच सर्वसामान्य मतदार बंधू-भगिनी यांच्या उपस्थितीत हा प्रचाराचा शुभारंभ होणार असून प्रभागात परिवर्तन घडवायचे आहे. त्यामुळे मतदारांनी आशीर्वाद रुपी मतदान करून प्रभाग क्रमांक 11 (अ) मधून एकदा संधी देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सुमित वर्मा यांनी केले आहे.

Oplus_131072

प्रभाग क्रमांक 11 अ मधून प्रस्थापितांच्या विरोधात उमेदवारी करत असताना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुमित वर्मा यांना लाभत आहे. नेहमीच समाजकारण करत आल्यामुळे नगरकरांच्या ओळखीचा आणि आश्वासक चेहरा म्हणून मतदार सुमित वर्मा यांच्याकडे पाहत आहेत. नुसते आश्वासन नाही तर ठोस कारवाई करणारा व्यक्ती म्हणून सुमित संतोष वर्मा यांची ओळख नगर शहरात झालेली असल्यामुळे प्रभाग क्रमांक 11 मधून संधी मिळाल्यास प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जीवाचे रान करू आणि प्रत्येक प्रश्न सोडवण्याचं काम करू त्यामुळे एकदा संधी द्यावी असे आवाहन हे सुमित वर्मा यांनी केले आहे.

तर मग लक्षात ठेवा
सुमित संतोष वर्मा
प्रभाग क्रमांक ११ अ
अनुक्रमांक ५

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular