Homeविशेषराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शोकसभेचे...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन

advertisement

अहिल्यानगर दिनांक ३० जानेवारी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये दुःख निधन झाले असून संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाले आहे. अहिल्यानगर शहराचे सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चांगलेच ऋणानुबंध होते शहराच्या विकासासाठी मोठा निधी त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पहिले नगर शहराला दिला होता विशेष म्हणजे राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणूक मध्ये 27 जागा जिंकत अहिल्यानगर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा आमदार संग्राम जगताप यांनी फडकवला होता त्यामुळे अजित पवार आमदार संग्राम जगताप आणि आयले नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर खुश होते. अहिल्या नगर शहराला पुन्हा एकदा मोठा निधी मिळणार अशी अपेक्षा असतानाच विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे दुःख निधन झाले आहे.

Oplus_0

स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता संग्राम चौक, भिस्तबाग महालाजवळ शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी उपस्थित रहावे आवाहन आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular