अहिल्यानगरदिनांक २८ मार्च
माळीवाडा वेस प्रकरणी आता शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेचे आमदारांचे नगरसेवक गटनेते दत्तात्रय हरीभाऊ कावरे यांनी आयुक्तांना पत्र देऊन माळीवाडा वेस पडू नये असे निवेदन दिले असून तसेच २०११ सालचा वेश संवर्धन करावे याचा दाखला देत वेस पडल्यास न्यायालयाचा व पुरातत्व विभाग, भारत सरकार यांच्या आदेशाची पायमल्ली केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
माळीवाडा वेस ही ४०० वर्षापुर्वीची ऐतिहासिक वास्तु आहे. तसे पत्र पुरातत्व विभागाने औरंगाबाद विभाग पुरातत्व विभागाला पाठविले आहे. भारत सरकार पुरातत्त्व विभागाने माळीवाडा बेस हिचे संवर्धन करावे, सुशोभिकरण करावे, पुरातत्व विभागांतर्गत येणारी ही वास्तु महानगरपालिकेने पाहू नये, तिचा सांभाळ करावा असे पत्र तत्कालिन आयुक्त यांना दिनांक १३ सप्टेंबर २०११ रोजी दिले. हे पत्र दिनांक १९ सप्टेंबर २०११ रोजी महानगरपालिकेने स्विकारले आहे. याही प्रक्रियेत जिल्हा न्यायालयाने हस्तक्षेप करुन दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी वेस पाडु नये याकरिता मनाई हुकुम आदेश दिला असून ही वेस पाडण्याबाबत काही नगरसेवकांनी ठराव पत्र आपणाकडे दिले आहे. तरी ठराव करुन व न्यायालयाचा, पुरातत्व खात्याचा आदेश डावलून आपण माळीवाडा वेस पाडण्याची कारवाई केली तर आम्ही ठरावावर सही करणारे नगरसेवक तसेच महापौर, आयुक्त व वेस पाडण्यास जबाबदार असणारे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करु. न्यायालयाचा व पुरातत्व विभाग, भारत सरकार यांच्या आदेशाची पायमल्ली आपण करु नये हि नम्र विनंती.





