अहिल्यानगर दिनांक २८ मार्च
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेचा आजचा दुसरा दिवस होता महापौर ज्योती गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडत असून आज झालेल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय महासभेत नगरसेवक विकास जगताप यांनी महानगरपालिकेच्या रक्तपेढीच्या कारभाराबाबत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते.लाखो रुपयांचा खर्च करून नागरिकांना रक्तपेढीच्या वतीने सेवा मिळत नसून फक्त नगरकरांच्या कर रुपी पैसे हे कर्मचाऱ्यांच्या पगार वाटपात जात असल्याचे त्यांनी यावेळी नगरसेवक सदस्यांना आणि महानगरपालिकेच्या प्रशासनास निदर्शनास आणून दिले ही रक्तपेढी खाजगी संस्थेला चालवण्यात द्यावी अशी मागणी ही यावेळी नगरसेवक विकास जगताप यांनी सभेत बोलताना केली
रक्त पेढी बंद ठेऊन फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी दर महिन्याला तीन ते चार लाख रुपये खर्च होतात मात्र रक्तपेढीकडून नागरिकांना शून्य सेवा मिळते. नगरसेवक विकास जगताप यांनी हा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे जानेवारी ते मार्च या तीन महिन्या दरम्यान अहिल्यानगर महानगरपालिकेच्या रक्तपेढीकडून एकही बाटलीचे रक्त संकलन करण्यात आले नाही हा खुलासा खुद्द महापालिका प्रशासनाने केल्यामुळे नगरसेवक विकास जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर शिक्का मुहूर्त झाले असून. जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या काळात फक्त एक हजार बाटल्यांचे रक्त संकलन रक्त पेढीने केले असून यावर जवळपास 63 लाख रुपये वार्षिक खर्च झाल्याचे महानगरपालिका प्रशासन सांगत असल्यामुळे नागरिकांचा पैसा हा कशा पद्धतीने खर्च होतोय याचा मूर्तीमंत उदाहरण नगरसेवक विकी जगताप यांनी नगरकरांना दाखवून दिले आहे.रक्तपेढी महापालिकेला चालवता येत नसेल तर ती खासगी संस्थेकडे द्यावी, अशी भूमिका जगताप यांनी मांडली.





