Homeदेशजम्मू मधील अनेक दुकानांमध्ये आजही देवघरात लावले दिसतात स्व.हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे...

जम्मू मधील अनेक दुकानांमध्ये आजही देवघरात लावले दिसतात स्व.हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो.. मनविसेचे सुमित वर्मा यांनी केले जम्मू मधील फोटो शेअर

advertisement

जम्मु काश्मीर
१९ जानेवारी १९९० ची रात्र काश्मिरी पंडितांसाठी काळरात्र ठरली होती. काश्मीरच्या मुस्लिम कट्टरतावाद्यांनी बंदुकीच्या जोरावर मायनॉरिटी असलेल्या पंडितांना काश्मीर व्हॅली सोडून जाण्यास भाग पाडलं होतं. लाखो काश्मिरी पंडित ज्या ठिकाणी ते वर्षानुवर्षे राहिले, वाढले जिथं त्यांनी आपली मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जीवावर समाजात सन्मानाचं स्थान मिळवलं आज तिथूनच त्यांना हाकलून देण्यात येत होतं.
वडिलजाद्यांपासून कमावलेली घरदार, जमीन जुमला, दागदागिने सगळं काही आहे तिथे सोडून नुसत्या कपड्या लत्त्यांवर त्यांना काश्मीर सोडवा लागलं होतं. त्यात काश्मिरी पंडितांकडून प्रॉपर्टी घ्यायला पण बंदी घालण्यात आली होती. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा ”जो इधर कमया हे वो इधरही रहेगा असं म्हणत” कट्टरतावाद्यांनी व्हॅली सोडून जाणाऱ्या पंडितांना लुटायला सुरवात केली.त्यामुळं एका रात्रीत आयुष्यभरची कमाई जाऊन दारिद्र्यता आयुष्य जगण्याची वेळ आली होती.
सरकारकडून फक्त कॅम्प उभारून काश्मिरी निर्वासितांबद्दलची आपली जबाबदारी झटकून देण्यात आली होती. तात्पुरती उपाययोजण्या काही प्रमाणात झाल्या मात्र ज्या त्यांच्या पोटापाण्याची, शिक्षणाची, रोजगाराची अशी निश्चित मदत करण्यास मात्र सरकार पुढे येत नव्हतं. सर्व अगदी तुटपुंज्या प्रमाणात केलं जात होतं. ज्याप्रमाणे काश्मीर मध्ये त्यांना एकटं सोडून देण्यात आलं होतं तसंच त्यांना आता विस्थापनांनंतरही वाऱ्यावर सोडण्यात आलं होतं.
आणि अशावेळी संपूर्ण देशामधून एक नाव पंडितांच्या मदतीला आलं ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. प्रसिद्ध पत्रकार राहुल पंडिता जे स्वतः या काश्मीरमधल्या पंडितांवरील अत्याचारांचे व्हिक्टिम होते ते बाळासाहेबांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांनी अनेकवेळा सांगितले की
” काश्मिरी पंडितांची मदत फक्त एकाच नेत्याने केली आहे आणि ते म्हणजे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे”

बाळासाहेब यांनी केलेल्या उपकाराची जाणीव अजूनही जम्मू मध्ये अनेक व्यापाऱ्यांना आहे. त्यामुळेच जम्मूमधील वैष्णोदेवी ला गेल्यावर आपल्याला स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो ठिकठिकाणी दुकानात अक्षरशः देवघरत ठेवल्याप्रमाणे दिसून येतात असते होते म्हणून आम्ही येथे आहोत अशीच भावना व्यापारी वर्ग करताना दिसतो. त्याचबरोबर वैष्णोदेवी यात्रा असेल किंवा अमरनाथ यात्रा असेल या दोन्ही यात्रेंवर नेहमीच अतिरेकी हल्ल्याचे सावट असायचे मात्र जेव्हा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबत कठोर भूमिका घेत दोन्ही यात्रांवरील हल्ले थांबले नाही तर हजरला जाणारे एकही विमान उडू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे आजही यात्रा अखंड सुरू आहे. अशा अनेक गोष्टींमुळे आजही जम्मू कश्मीर मधील अनेकांच्या हृदयात स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कोरलेले आहे त्यामुळेच अनेक दुकानांमध्ये आजही हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आपल्याला जम्मू मधील अनेक दुकानात दिसून येतात.

अहिल्यानगरचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुमित वर्मा हे वैष्णोदेवी येथे दर्शनात गेल्यानंतर त्यांना ठीक ठिकाणी दुकानांमध्ये हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो दिसल्यानंतर त्यांनी निश्चितच ही गोष्ट आपल्या कॅमेरा तर कैद केलीच मात्र महाराष्ट्रासाठी ही एक अभिमानाची गोष्ट असून आजही हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येकाच्या मनामनात असल्याचे प्रतीक जम्मू-काश्मीरमध्ये दिसून येत असल्याचा त्यांनी सांगितले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular