Homeविशेषस्वराज्य बहुउद्देशीय विकास संस्थेच्या अ‍ॅपचे भव्य उद्घाटन व ‘स्वराज्य बालजत्रा’चे आयोजन

स्वराज्य बहुउद्देशीय विकास संस्थेच्या अ‍ॅपचे भव्य उद्घाटन व ‘स्वराज्य बालजत्रा’चे आयोजन

advertisement

अहिल्यानगर, प्रतिनिधी : स्वराज्याची प्रेरणा घेऊन आर्थिक स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्प मांडत स्वराज्य बहुउद्देशीय विकास संस्थेच्या अ‍ॅपचे भव्य उद्घाटन तसेच ‘स्वराज्य बालजत्रा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. 30 ऑगस्ट 2026 रोजी जाधव लॉन, नगर-कल्याण रोड, अहिल्यानगर येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत शिवाजी राजे जाधव, सिंदखेडराजा (राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे वंशज) यांच्या शुभहस्ते होणार असून, आर्थिक स्वराज्याच्या नव्या पर्वाची सुरुवात या माध्यमातून होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण असलेल्या ‘स्वराज्य बालजत्रा’ अंतर्गत समाजातील बाल उद्योजकांना त्यांच्या कल्पकतेला, मेहनतीला आणि उद्योजकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या जत्रेत बाल उद्योजकांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार असून, त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.

सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत बालजत्रा आयोजित करण्यात येणार असून, दुपारी 12.30 वाजता अ‍ॅपचे उद्घाटन होईल. समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाल उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाला सकल मराठा समाजाची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, इतिहासातून प्रेरणा घेत आर्थिक स्वराज्याकडे वाटचाल करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular