Home सांस्कृतिक खबर अहिल्यानगरची विशेष गंगा उद्यान चौकात ५ सप्टेंबरला भव्य दहिहंडी उत्सव; बॉलिवूड...

खबर अहिल्यानगरची विशेष गंगा उद्यान चौकात ५ सप्टेंबरला भव्य दहिहंडी उत्सव; बॉलिवूड अभिनेत्री कायनात अरोरा यांची विशेष उपस्थिती

3
Oplus_0

अहिल्यानगर प्रतिनिधी :
सावेडी परिसरातील गंगा उद्यान चौक येथे यंदा पाचव्या वर्षी भव्य दहिहंडी उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले असून या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मा. आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य युवा प्रतिष्ठान तर्फे हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणून बॉलिवूड अभिनेत्री Kainaat Arora उपस्थित राहणार असल्याने तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विविध गोविंदा पथकांच्या थरारक मानवी मनोऱ्यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल पाहायला मिळणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या गोविंदा पथकासाठी ₹१,११,१११/- चे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले असून जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक नामांकित गोविंदा पथकांनी सहभागाची तयारी दर्शविली आहे.
उत्सव शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गंगा उद्यान चौक, सावेडी, अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आयोजक
सौ. गौरी अजिंक्य बोरकर
नगरसेविका, मनपा अहिल्यानगर
श्री. अजिंक्य सुधाकर बोरकर
नगरसेवक, मनपा अहिल्यानगर

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here