Home क्राईम प्लास्टिक बंदी कारवाईदरम्यान मनपा पथकाला अडथळा; मेडिकल दुकानदाराविरुद्ध गुन्हा माळीवाडा परिसरातील कारवाई;...

प्लास्टिक बंदी कारवाईदरम्यान मनपा पथकाला अडथळा; मेडिकल दुकानदाराविरुद्ध गुन्हा माळीवाडा परिसरातील कारवाई; शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप

4
Oplus_0

“खबर अहिल्यानगरची”
अहिल्यानगर प्रतिनिधी :
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्लास्टिक बंदी पथकाने माळीवाडा परिसरात केलेल्या तपासणीदरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका मेडिकल दुकान मालकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक ऋषिकेश शंकर भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४० वाजण्याच्या सुमारास माळीवाडा येथील विशाल गणपती परिसरातील एका मेडिकल व जनरल स्टोअर्समध्ये प्लास्टिक बंदीबाबत तपासणी मोहीम राबविण्यात येत होती. या वेळी पथकास दुकानात सिंगल युज प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याचा आरोप आहे.

कारवाईदरम्यान नियमांनुसार दंड भरण्याबाबत सांगितले असता संबंधित दुकानदाराने मनपा कर्मचाऱ्यांशी वाद घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या कारवाईवेळी स्वच्छता निरीक्षक प्रशांत चांदणे, संदीप चव्हाण, राजेंद्र सामल, सुरेश वाघ, प्रसाद उमाप व शुभम उपलंची आदी कर्मचारी उपस्थित होते.

या घटनेनंतर अहिल्यानगर महानगरपालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ६९ अन्वये स्वच्छता निरीक्षक ऋषिकेश भालेराव व प्रशांत चांदणे यांना संबंधित प्रकरणात तक्रार दाखल करण्यासाठी अधिकृत केले आहे.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २२१, ३५१(२) व ३५२ अन्वये अदखलपात्र गुन्हा क्रमांक १२४०/२०२६ नोंदविण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here