Home विशेष निकम यांच्या जीवनावरील ‘प्रहार’ चित्रपटाचा नगरमध्ये खास शो! आमदार संग्राम जगताप यांचा...

निकम यांच्या जीवनावरील ‘प्रहार’ चित्रपटाचा नगरमध्ये खास शो! आमदार संग्राम जगताप यांचा पुढाकार; रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या सदस्यांसाठी मोफत शो चे आयोजन..

4
Oplus_0

अहिल्यानगर : देशातील महत्त्वाच्या दहशतवादी हल्ल्यांच्या खटल्यांमध्ये न्यायासाठी लढा देणारे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा खास शो अहिल्यानगर शहरात आयोजित करण्यात आला असून, यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.

आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या माध्यमातून सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी शहरातील ‘माय सिनेमा’ चित्रपटगृहात क्लबच्या सदस्यांसाठी या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायालयीन लढा दिला आहे. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबविरुद्धचा खटला तसेच १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील कायदेशीर लढाई यांसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर न्यायासाठी केलेले प्रयत्न, न्यायालयीन आव्हाने आणि या लढ्यादरम्यान आलेल्या अडचणींचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.

दिग्दर्शक अविनाश अरुण यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव यांनी उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. न्यायव्यवस्थेतील संघर्ष आणि दहशतवादाविरोधातील कायदेशीर लढा मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणार आहे.

उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत नगरकरांसाठीही खास शो?
दरम्यान, अहिल्यानगरकरांसाठीही हा चित्रपट पाहण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत येत्या काही दिवसांत नगरकरांसाठी चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या संभाव्य आयोजनाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

न्यायासाठीचा संघर्ष, देशाच्या सुरक्षेसाठी लढलेली कायदेशीर लढाई आणि उज्ज्वल निकम यांच्या कार्याचा प्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी अहिल्यानगरकरांना मिळण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here