HomeUncategorizedपत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू सुजित पाटकर यांनी उपचार न दिल्यामुळे झाला...

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू सुजित पाटकर यांनी उपचार न दिल्यामुळे झाला – किरीट सोमय्या

advertisement

पुणे दि.५ फेब्रुवारी
संजय राऊत यांच्या मुळे सुजित पाटकर यांना मिळालेल्या ठेक्या मधून कोविड सेंटर उभारून कोविड पेशंटच्या जीवाशी खेळून अनेकांचे मृत्यू झाले असल्याचा आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

जी कंपनी अस्तित्वात नाही त्यांना या सरकारने टेंडर दिल त्या मुळे सुमारे 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला असून संजय राऊत यांचे कुटुंबीय सुजित पाटकर यांच्या बरोबर भागीदारी मध्ये काम करत असल्याचे पुरावे किरीट सोमय्यांना सादर केले आहेत. एका टीव्ही चॅनेल चे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला सुजित पाटकर हे जबाबदार असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. पांडुरंग रायकर हे पुणे येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

या सर्व बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे तक्रार केली असून घोटाळ्यात सामील असलेल्या लोकांनवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे आणि सुजित पाटकर यांच्यावर पुणे येथे गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्या जाणार आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular