HomeUncategorizedछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा नूतनीकरणावरून सत्ताधारी शिवसेनेने केले मित्रपक्ष राष्ट्रवादीवर गंभीर टीका,...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा नूतनीकरणावरून सत्ताधारी शिवसेनेने केले मित्रपक्ष राष्ट्रवादीवर गंभीर टीका, फेसबुक वर रंगले आरोप प्रत्यारोपांचे युध्द

advertisement

अहमदनगर दि.६ फेब्रुवारी
अखंड हिंदू समाजाच्या वतीने आज अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.


मात्र या कार्यक्रमानंतर आता सोशल मीडियावर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असे युद्ध रंगले आहे अहमदनगर महानगर पालिकेत सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीचे राज्य असून महानगर पालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहीणी शेंडगे महापौर आहेत आजचा कार्यक्रम हा महानगरपालिकेच्या खर्चातून झाला असून या कार्यक्रमाला शिवसेनेच्या महापौरांना तब्बल एक तास वाट बघावी लागली तसेच महानगरपालिकेचा कार्यक्रम असूनही राष्ट्रवादीच्या आमदारांचे बोर्ड लावण्यात आले असल्याने या प्रकाराचा निषेध शिवसेनेच्या काही फेसबुक पेज वरून करण्यात आला आहे.


हा कार्यक्रम नेमका अखंड हिंदू समाजाचा होता का राष्ट्रवादीचा होता असा सवालही या फेसबुकवर करण्यात आला आहे त्यामुळे या कार्यक्रमानंतर आता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असं फेसबुक युद्ध पेटल आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular