Homeजिल्हानागर शहरातील खवय्यांसाठी गंभीर बंधूंचे शुद्ध शाकाहारी आपना पंजाब रविवार पासून नागरकरांच्या...

नागर शहरातील खवय्यांसाठी गंभीर बंधूंचे शुद्ध शाकाहारी आपना पंजाब रविवार पासून नागरकरांच्या सेवेत

advertisement

अहमदनगर दि.१२ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील खवय्यांची जिभेची ओळखणाऱ्या गंभीर बंधूंनी हॉटेल व्यवसायात आपली ओळख वेगळ्या नावाने कोरली आहे. आजपर्यंत त्यांनी विविध हॉटेल च्या माध्यमातून मांसाहारी खवय्यांसाठी उत्कृष्ट सेवा दिलेली असून आता शाकाहारी खवय्यांसाठी आपना पंजाब फॅमिली रेस्टॉरंटच्या माध्यमातून आपली सेवा सुरू करत आहेत.

तारकपूर येथे असणाऱ्या पंजाबी तडका या हॉटेल नंतर आता गंगा उद्यान शेजारीच पंजाबी वातावरणामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने आपना पंजाब फॅमिली रेस्टॉरंट  उभारले असून या फॅमिली रेस्टॉरंटचा शुभारंभ रविवारी दि.१३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता विधान परिषदेचे आमदार अरुण काका जगताप आणि अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती चरणजीत सिंग गंभीर यांनी दिली आहे .

अपना पंजाब या फॅमिली रेस्टॉरंट मध्ये शुद्ध शाकाहारी पंजाबी तसेच महाराष्ट्रीयन आणि दक्षिण भारतीय पद्धतीचे जेवण या ठिकाणी खवय्यांसाठी मिळणार आहे. याचबरोबर हॉटेल परिसरामध्ये पंजाबी पद्धतीच्या धर्तीवर वातावरण निर्मिती केली असल्याने या ठिकाणी जेवणाचा आनंद काही वेगळाच मिळणार आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular